Enforcement Directorate  Dainik Gomantak
गोवा

Delhi Excise Scam: करोडो रुपये दिल्याचा आरोप, गोव्यातून वकीलाला अटक; ईडीची कारवाई

Delhi Excise Scam: दिल्ली सरकारचे 2021-22 साठी उत्पादन शुल्क धोरण तयार आणि लागू करताना कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित हे प्रकरण आहे.

Pramod Yadav

Delhi Excise Scam

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आणखी एक अटक केली आहे. ईडीने गोव्यातून वकील विनोद चौहान यांना अटक केली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान 'आप' (Aam Aadmi Party) ला करोडो रुपये दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणात ईडीची ही 18वी अटक आहे. याआधी या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही ईडीने कारवाई केली असून ते तुरुंगात आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या के. कविता यांच्या एका कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबाच्या आधारे वकील विनोद चौहान यांना अटक करण्यात आल्याचे, ईडीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कविताच्या कर्मचाऱ्याने 8 जुलै 2023 रोजी एक निवेदन दिले होते, ज्यात अभिषेक बोईनपल्लीच्या सूचनेनुसार तिने दिनेश अरोरा यांच्या कार्यालयातून रोख भरलेल्या दोन बॅग घेतल्या होत्या आणि विनोद चौहान यांना दिल्याचे उघड झाले होते.

यानंतर पुन्हा एकदा तोडापूर येथील एका पत्त्यावरून दोन बॅग रोख रक्कम घेऊन विनोद चौहान यांना दिली. या संपूर्ण प्रकरणात विनोद चौहान यांनी गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी हवालाद्वारे आम आदमी पक्षाकडे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

दिल्ली सरकारचे 2021-22 साठी उत्पादन शुल्क धोरण तयार आणि लागू करताना कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित हे प्रकरण आहे. याबाबत मुख्य सचिवांनी लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांना पत्र लिहून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आणि त्यानंतर हे धोरण तातडीने रद्द करण्यात आले.

यानंतर दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची शिफारस केली होती आणि त्यानंतर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांचे पक्षाचे सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या. के कविता व्यतिरिक्त ईडीने अनेक दारू व्यापारी आणि इतर अनेक लोकांना अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT