फोंडा पालिका Dainik Gomantak
गोवा

'सोपो' कंत्राट कराराला एका महिन्याची मुदत वाढ: फोंडा पालिका

सर्वेक्षणानंतर सोपस्कार: फोंडा पालिका बैठकीत निर्णय

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा बाजार परिसरातील सोपो कराचे कंत्राट या मार्च महिन्यात संपत असून संबंधित कंत्राटदाराला पुढील एक महिना वाढवून देण्याचा निर्णय फोंडा पालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पुढील महिन्यानंतर सोपोकराचा पुन्हा लिलाव करायचा, की पालिकेच्या कामगारांकडून हा सोपो कर वसूल करायचा, यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल. मात्र, त्यापूर्वी सोपो करासंबंधीचे सर्वेक्षण करूनच हा निर्णय होईल, असे फोंड्याच्या नगराध्यक्ष गिताली तळावलीकर यांनी स्पष्ट केले.

फोंडा पालिकेच्या या बैठकीला नगराध्यक्ष गिताली तळावलीकर, उपनगराध्यक्ष जया सावंत तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते. पालिका मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांनी बैठकीचे कामकाज हाताळले.

फोंडा पालिका अखत्यारीतील सोपो कराचे कंत्राट मार्चमध्ये संपत आहे. मात्र, अजून नवीन लिलाव करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोपो कराचा लिलाव करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराला एक महिना मुदतवाढ देण्यात येईल. पालिका क्षेत्रातील विक्रेत्यांना ‘वेंडर कार्ड' देण्यासंबंधीचा निर्णयही यावेळी झाला.

फोंडा पालिकेच्या मार्केट संकुलातील बहुतांश दुकाने पडून असून लिलावाला ग्राहकांचा प्रतिसाद लाभत नाही. दुकाने विनावापर पडून असल्याने पालिकेला निधीही उपलब्ध होत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने ठरवून दिलेल्या दरानुसार हा लिलाव करण्यात येत असल्याने ग्राहक हा दर परवडत नसल्याचे सांगत आहे.

लिलावाचा दर परवडेना : दुकानासाठी सुरक्षा अनामत म्हणून पालिकेने एक लाख रुपये दर ठरवला आहे. त्यामुळे हे दर परवडत नसल्याच्या कारणामुळेच दर वेळेला लिलाव केला जात असला तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यासंबंधी बैठकीत चर्चा करून लिलावाच्यावेळी दर कमी करण्यासंबंधी निर्णय झाला.

प्रतिदिन सातशे रुपये द्या!

पालिकेतील रोजंदारी कामगारांना प्रतिदिन सातशे रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन पालिकेकडे आले असून बैठकीत ठेवले असता, त्यावर चर्चा करूनच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्ष गिताली तळावलीकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT