Accident News Dainik Gomantak
गोवा

Accident in Ponda : तिस्क उसगाव येथे अज्ञात वाहनाची धडक; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला सध्या तिस्क येथे कामानिमित्त भाड्याने राहत होती. या अपघातानंतर फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून तपासही सुरु केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Accident in Ponda : तिस्क उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ आज शुक्रवारी भल्या पहाटे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. अनघा आनंद देसाई असं या 44 वर्षीय महिलेचं नाव असून मृत महिलेचं मूळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज असल्याची माहिती आहे. ही महिला सध्या तिस्क येथे कामानिमित्त भाड्याने राहत होती. या अपघातानंतर फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून तपासही सुरु केला आहे.

गोव्यात आजचा शुक्रवार अपघातवार ठरल्याचं दिसत आहे. अगदी सकाळीच दोन भीषण अपघात गोव्यात घडले असून यात एका महिलेसह अन्य एका सायकलस्वाराला आपला जीव गमावावा लागला आहे. फोंड्यात तिस्क येथे झालेल्या अपघातानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. अज्ञात वाहनचालकाने महिलेला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पलायन केल्यामुळे त्याला शोधणं पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस या वाहनचालकाचा शोध घेणार आहेत.

दरम्यान पणजीजवळच असलेल्या चिंबल जंक्शनवर आज सकाळी कदंब बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कदंब बसची जोरदार धडक सायकलला बसल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चिंबल जंक्शनपासून ते पणजी बसस्थानकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगाही पाहायला मिळाल्या.

सकाळीच वाहतूक कोंडी झाल्यामुळे मडगावकडून येणाऱ्या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामावर जाणाऱ्या लोकांची या कोंडीमुळे चांगलीच अडचण झाली. अनेकांनी पायी चालत पणजी बसस्थानक गाठलं. वाहतूक पोलीस मेरशी जंक्शनवर उपस्थित असूनही कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना अडचणी आल्याचं दिसून आलं. त्यातच पणजीत पावसाच्या सरी बरसल्याने कोंडीत भरच पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

SCROLL FOR NEXT