Accident in Ponda Goa Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात रविवार ठरला अपघातवार

3 ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये 17 जखमी; एकाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत काल रविवारी सायंकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू; तर 17 जण जखमी झाले. पार उसगाव-खांडेपार येथील जीपगाडी व दुचाकीच्या जोरदार टकरीत वाघोण-दाभाळ येथील प्रकाश गावकर (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. ते वनखात्याचे कर्मचारी होते.

दुसऱ्या एका अपघातात बोंडलाहून परतणाऱ्या पर्यटक बसगाडीला अपघात होऊन बसगाडी उलटल्याने बारा पर्यटक प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना पिळये-तिस्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. त्यातील काहीजणांना बांबोळी इस्पितळात अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले; तर बायथाखोल-बोरी येथील तिसऱ्या अपघातात दोन कारगाड्यांच्या जोरदार ठोकरीमुळे पाचजण जखमी झाले.

फोंड्याहून तिस्क-उसगावच्या दिशेने जाणाऱ्या (GA-05-T-4268) जीपगाडीने समोरून चालणाऱ्या (GA-12-B-3850) दुचाकीला जोरदार ठोकर दिली. दोन्ही वाहने एकाच दिशेने जात होती; पण जीपगाडी भरधाव असल्याने दुचाकीस्वाराला त्याचा अंदाज आला नसल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या ठोकरीनिशी दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. जीपगाडीने स्वारासह दुचाकीला फरफटत पुढे नेले. त्यात गावकर यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताला कारणीभूत ठरलेला जीपगाडीचा चालक उसगाव येथील सचिन खराडे (वय 42, मूळ कोल्हापूर) याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. फोंडा पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

एअर बॅगमुळे प्राण वाचले

बायथाखोल-बोरी येथे फोंड्याहून बोरीच्या दिशेने जाणारी (GA-06-D-1528) कारगाडी व बोरीहून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या (GA-05-F-3223) कारगाडीत जोरदार टक्कर झाली. या अपघातात जयेश नाईक, मनोहर नाईक, नरेश शिरोडकर, सर्वेश नाईक व दिलीप माणगावकर हे कारमधील प्रवासी जखमी झाले. अपघातावेळी एअर बॅग फुलल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना 10 हजारांहून अधिक दंड! गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

SCROLL FOR NEXT