10th students.jpg 
गोवा

संजय स्कूलचा शंभर टक्के निकाल

तनिष्का जी. रामास्वामी या विद्यार्थिनीने मिळवला प्रथम क्रमांक

दैनिक गोमन्तक

पर्वरी: सलग नवव्या वर्षी गोव्यातील संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनचा 100 % निकाल लागला आहे. संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनचे पर्वरी, वास्को आणि कुडचडे या तीन केंद्रातून एकूण 49 विशेष विद्यार्थी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. ( One hundred percent result of Sanjay School )

संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनच्या पर्वरी केंद्रातून 30 विशेष विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तनिष्का जी. रामास्वामी या विद्यार्थिनीने 90 % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर निकेश थापा याने 83. 33 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. गिब्सन क्लाइव्ह डिसोझा याने 86.67 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. उर्वरित विद्यार्थी 60 ते 80 टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन-वास्को केंद्रातून सहा विशेष विद्यार्थी परीक्षेत बसले होते. शामस बी. परिषवाडी या विद्यार्थिनीने 81.5 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर आकाश हरिजन याने 81 % टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. अर्जुन पाटील याने 76 टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन-कुडचडे केंद्रातून 13 विशेष विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यात मुतादिर शेख याने 96.83 % मिळवून प्रथम आला आहे तर अनायझा रॉड्रिग्स 93.67 % सह द्वितीय आली आहे. अब्दुलगनी शेख याने 93.33 % मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन गोवा, पर्वरीच्या सदस्य सचिव नीतल आमोणकर आणि दिलीप मोरजकर, संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन गोवाचे प्रशासन व लेखाधिकारी यांनी 100 टक्के निकाल लागल्याबद्दल संजय स्कूलचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokmanya Tilak: 'केसरी'चं निर्भीड उत्तर, 'वर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट'विरोधात लोकमान्य टिळकांची लेखणी ठरली शस्त्र

Rashi Bhavishya 23 July 2025: मान-सन्मान आणि सामाजिक प्रसिद्धीचा दिवस, मनासारखी संधी चालून येईल; योग्य निर्णय घ्या

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

SCROLL FOR NEXT