Goa Accident case 
गोवा

नव्या गाडीच्या नशेत तरूणाचा बळी, थोडक्यात बचावले प्रेमी-युगल

कुडका येथील हे जोडपे काल रात्री श्‍यामाप्रसाद स्टेडियमजवळ असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी उभी करून बसले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी (Bambolim) येथे काल रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्‍या भीषण कार अपघातात विरल मेहता (26) हा जागीच ठार झाला तर चालक अरुण राय याची प्रकृती गंभीर आहे. अपघातात एक महिलाही जखमी झाली असून, तिचे पाय फ्रॅक्‍चर झाले आहेत.

आगशी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भरधाव वेगाने अलिशान गाडी चालवल्याने चालकाचे वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडीने रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या खांबाला जोरदार ठोकर दिली. त्‍याचवेळी एका दुचाकीलाही धडक दिली. रोशन राणे यांनी अलिशान गाडी शनिवारी घेतली होती. विरल व अरुण या दोन मित्रांसह ते दोनापावल येथे गेले होते. रात्री तेथून ते बांबोळीमार्गे पर्वरीकडे परतत होते.

बांबोळी येथील श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमजवळ असलेल्या वळणावर भरधाव वेगात असलेल्या चालक अरुण राय याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजखांबाला धडक दिली व उलटली. ही गाडी उलटून तशीच पुढे गेली व उभी करून ठेवलेल्या एका दुचाकीला धडकली. दुचाकीजवळ एक जोडपे उभे होते. हा भयानक अपघात पाहून व उलटलेली गाडी त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहताच महिला तेथून पळत सुटली. तरीसुद्धा तिच्या पायाला गाडीची धडक बसलीच. त्यामुळे तिचे पाय फ्रक्चर झाले.

कुडका येथील हे जोडपे काल रात्री श्‍यामाप्रसाद स्टेडियमजवळ असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी उभी करून बसले होते. या अपघातप्रकरणी पोलिसांनी चालक अरुण राय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अलिशान गाडी भरधाव वेगात होती. त्‍यामुळे गाडी व दुचाकीचा चक्काचूर झाला. अरुण राय याची प्रकृती गंभीर असून त्याला इस्‍पितळात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव विजयलक्ष्मी बालू (30) असे आहे.

कारमध्‍ये तिघेजण होते व त्यांची मद्यचाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक स्मिता मोरजकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT