Verna Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: रवी शिरोडकर हल्ल्याप्रकरणी दोडामार्गमधून एकाला अटक

रवी शिरोडकर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एटीएसने दोडामार्ग येथील रिसॉर्टमधून ब्रिजेश सावंत या आरोपीला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात गुन्हेगारीचं सत्र वाढतच आहे. रवी शिरोडकर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एटीएसने दोडामार्ग येथील रिसॉर्टमधून ब्रिजेश सावंत या आरोपीला अटक केली आहे. मनोजच्या सांगण्यावरुनच शिरोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे अधीक्षक दळवी यांनी सांगितले.

(One arrested from Dodamarg in connection with attack on Ravi Shirodkar)

रवी शिरोडकर हल्ला प्रकरणी; 5 संशयितांना अटक

रवी शिरोडकर हल्लाप्रकरणी हणजुण पोलिसांनी आंबोली (महाराष्ट्र) येथे दडून बसलेल्या आणखी पाच आरोपींना सापळा रचून अटक केली. आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आकरावर गेली आहे. म्हापसा पोलिसांनी प्रकरणातील संशयितांची माहिती देण्याकरिता आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी उप अधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, उप निरीक्षक साहिल वरक उपस्थित होते.

या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत टार्जन पार्सेकर,(हडफडे), शैलेश चंदु नाईक, (कामुर्ली-बार्देश), सिद्धांत सुर्यकांत मांद्रेकर (गोलेतीवाडा-साळगाव), अमन रोहिदास शिरोडकर (निगवाडा-साळगाव), प्रशांत दासा राजू (परप्रांतीय, सध्या रा.नागवा), राजेश उर्फ वुडू केरकर (मरड-साळगाव) सागर पाटील, साहिल पेडणेकर, सागर वावलापी (परप्रांतीय, सध्या रा.कांदोळी), श्रेणीत साखळकर (साळगाव) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

मनोजच्या सांगण्यावरुनच हल्ला-

या हल्ल्यामागचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुन्हेगार गजेंद्र सिंग उर्फ छोटु (सध्या तुरुंगात असलेला) याचा छोटा भाऊ मनोज सिंग याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे सध्या हणजुण पोलिस त्याच्या मागावर आहेत. हल्ल्याच्या वेळी मनोज सिंग संशयित टार्जन पार्सेकर यांच्या गाडीत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT