Rape case in Goa Dainik Gomantak
गोवा

सासष्टीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

पीडित तरुणीची तब्येत बिघडल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

मडगाव : मायणा कुडतरी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 15 वर्षीय मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सासष्टी (Salcete) तालुक्यातील मायणा कुडतरी भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. 22 वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती असून पोलिसांनी तरुणाला लागलीच अटकही केली आहे. अल्पवयीन मुलगी ही आरोपीच्या घरी पाणी भरण्यासाठी गेली होती. याचवेळी कुणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार (Rape) केला. यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. पीडित तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून ती मानसिक धक्क्यात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी (Police) मुलीचा जबाब नोंदवण्याचं काम सुरु केलं असून तपासही सुरु करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी करण्यात येत असून आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी खूशखबर! कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांना 100 टक्के टॅरिफमधून सूट, अमेरिकेत भारतीय औषधांची निर्यात होणार सोपी

Viral Post: "आई-वडिलांना देव मानू नका..." CEO च्या 'त्या' वादग्रस्त पोस्टने खळबळ; सोशल मीडियावर दोन गटांत जुंपली, वाचा संपूर्ण प्रकरण

Election Commission: धुके दाटलेले... निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासाचा कस

संपादकीय: पैशांची मस्ती अन् सत्तेचा माज...

Telangana CM Controversial Statement: 'प्रभु श्री राम श्रीमंतांचे, तर भगवान शिव गरिबांचे देव', काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ; भाजप आक्रमक VIDEO

SCROLL FOR NEXT