Mapusa police arrested One person from Bijapur Karnataka Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; एकाला अटक

संशयिताला कर्नाटकातील विजापूर येथून अटक करण्यात आली

Rajat Sawant

Mapusa Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एक संशयिताला अटक केली.

संशयिताला कर्नाटकातील विजापूर (Karnataka) येथून अटक करण्यात आली असून पिडित मुलीच्या आईने म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

संशयिताला म्हापसा न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने 10 जूनला म्हापसा पोलिसांत दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी तपास सुरु केला.

म्हापसा पोलीस स्थानकाचे पीएसआय बाबलो परब यांच्या नेतृत्वाखालील म्हापसा पोलिसांचे पथक एटागी, कर्नाटक येथे दाखल झाले. सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे अथक प्रयत्नांनंतर कर्नाटक, विजापूर, एटागी येथे पीडित मुलीसह संशयिताला पकडण्यात म्हापसा पोलिसांना यश आले.

नागेश कोलाकर (23, विजापूर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयितावर गोवा चिल्ड्रन ऍक्टच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित मुलीची गोमेकॉ येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत लैंगिक अत्याचार उघड झाल्यामुळे गुन्ह्यात पॉस्को (POCSO) कायदा देखील जोडण्यात आला आहे.

संशयिताला म्हापसा न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलील अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी आणि म्हापसाचे पीआय सीताकांत नायक यांच्या देखरेखीखाली एलपीएसआय रीचा भोंसले यांच्याकडे सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT