Bondla Zoo Dainik Goomantak
गोवा

Bondla Sanctuary: खुशखबर! गोव्यातील बोंडला प्राणी संग्रहालय आता पर्यटकांसाठी खुले; वनमंत्री राणेंनी दिली माहिती

Bondla Sanctuary Reopen: गोवा वन विभागाने या कालावधीत जबाबदारीने कार्य केले. प्राणी आणि पर्यटकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी सर्व जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

Sameer Panditrao

पणजी: एप्रिल महिन्यात रानमांजराच्या पाच प्रजाती मरण पावल्या होत्या. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून एप्रिल २०२५ पासून बंद ठेवलेले बोंडला प्राणी संग्रहालय आता पुन्हा पर्यटकांसाठी खुले केले आहे.

बुधवारपासून (२५ जून) हे प्राणी संग्रहालय पुन्हा खुले केले असून, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिजिजेस (निषाद), भोपाळ यांनी दिलेल्या नकारात्मक चाचणी अहवालानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गोवा वन विभागाने या कालावधीत जबाबदारीने कार्य केले. प्राणी आणि पर्यटकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी सर्व जैवसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. संभाव्य पक्षी फ्लू संसर्गाचा संशय आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राणी संग्रहालय तात्पुरते बंद करण्यात आले होते.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्राणी, विशेषतः पक्ष्यांवर देखरेख ठेवून नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्राप्त अहवालानुसार, कोणत्याही प्रकारचा संसर्ग आढळला नाही. त्यामुळे आता बोंडला पुन्हा पर्यटकांसाठी खुले केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT