Divya Rane Dainik Gomantak
गोवा

निवडून आल्‍यावर दिव्या राणे प्राधान्यांन 'हे' काम करणार

या निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी कोण? दिव्या राणे म्हणतात..

दैनिक गोमन्तक

पर्ये मतदारसंघात सर्वांना रोजगार मिळवून देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे आपले मुख्य ध्येय आहे. त्याचबरोबर गोव्यातील सर्वांत उंच ठिकाण असलेल्या या मतदारसंघातील सुर्ल या गावाचे रुपांतर ‘हिल स्टेशन’मध्ये करून पर्येला पर्यटनकेंद्र बनवण्याचा आपला मानस आहे, असे पर्ये मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. दिव्या विश्‍‍वजीत राणे (Divya Rane) यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

विधानसभेवर जाण्यासाठी आपण हाच मतदारसंघ का निवडला?

मी निवडलेला हा मतदारसंघ पर्ये (PORIEM) व वाळपई या गावांचा एक भाग आहे. या सर्व टापूत आम्ही म्हणजे आमच्या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. येथील लोकांशी गेल्या 50 वर्षांपासून आमचे अतिशय निकटचे संबंध आहेत. तर, माझे पती विश्‍वजीत राणे हे गेल्या 15 वर्षांपासून आमदार, मंत्री या नात्याने काम करत आहेत. त्यांच्याबरोबरीने माझेही या लोकांशी स्‍नेहसंबंध निर्माण झाले आहेत आणि आता मीही समाजकारणातून सक्रिय राजकारणात येण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे मला वाटले.

कारण विश्‍वजीत राणे यांच्याबरोबर या भागात वावरत असल्याने माझे येथील महिला, युवावर्ग यांच्याशी नाते निर्माण झाले. त्यातूनच त्यांचे जे विविध प्रश्‍न, मुद्दे आहेत ते विधानसभेत जाऊन सोडविण्याचा विचार पक्का झाला आणि साहजिकच हा मतदारसंघ (Constituency) निवडला.

तुमचे सासरे प्रतापसिंग राणे गेली 50 वर्षे या मतदारसंघाचे आमदार राहिले आणि मंत्री, मुख्यमंत्री अशी उच्च पदे त्यांनी भूषविली. त्याबद्दल काय सांगाल?

माझ्या सासऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सत्तरीबरोबरच संपूर्ण गोव्यासाठी खूप कार्य केले आहे. मीसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखे काम करू इच्छिते. त्याच विचारातूनच समाजसेवेसाठी सक्रिय राजकारणात (Politics) उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील युवक आणि महिला यांना पुढे आणून त्यांचा विकास साधणे हे माझे मुख्य ध्येय आहे. त्याच दृष्‍टिकोनातून मी माझी कारकीर्द पुढे नेणार आहे.

तुम्ही निवडून आल्‍यावर प्राधान्य काय राहील?

सत्तरी (Satari) तालुक्यात आज मुख्य मुद्दा आहे तो वाढत्या बेरोजगारीचा. तशी ही समस्या सर्वत्रच आहे. त्यामुळे ती सोडविण्याला माझे प्राधान्य राहणार आहे. त्या अनुषंगाने माझा गांभीर्यपूर्वक दृष्टिकोन आहे. वेर्णा येथे जसे विविध उद्योग, कारखाने आहेत तसेच येथेही आणावेत. त्याद्वारे येथील सुशिक्षित युवकांना रोजगार मिळवून देण्याचा विचार आहे. तसेच कमी शिकलेल्या महिलांनाही त्या कारखान्यांमध्ये त्यांच्या कुवतीनुसार रोजगाराच्‍या संधी मिळतील. सरकारी नोकऱ्या उपलब्ध करण्याचे काम आम्ही केले आहे.

येथील लघु धरणाचे काम पूर्ण करून शेती करणाऱ्या महिलांना उत्तेजन देणार आहे. तसेच स्वव्यवसाय करण्यासही मदत करणार आहे. पर्ये मतदारसंघ एक उत्तम पर्यटनकेंद्र बनविण्याचा विचार आहे. या मतदारसंघातील सुर्ल हे एक सुंदर असे हिल स्टेशन बनू शकते. त्यासाठी तेथे हॉटेल्स आणली जाऊ शकतात. तसेच अंजुणे धरणाचे सौंदर्यीकरण करून तेही पर्यटनाचे आकर्षण बनविले जाईल. यामुळे हा संपूर्ण परिसर बदलून जाणार आहे. येथील पंचायतींनाही त्याचा लाभ होणार आहे.

या निवडणुकीत तुमचे प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहेत असे तुम्हाला वाटते?

माझा प्रतिस्पर्धी कोण आहे त्याकडे मी पाहत नाही. माझा प्रतिस्पर्धी काय करतो तेही मी पाहत नाही. मी जे काय साध्य करणार आहे त्याबद्दल मला पूर्ण आत्मविश्‍वास आहे. युवक, महिला माझ्या संपर्कात आहेत व त्यांची संख्या आता दुप्पट झाली आहे. ते सर्वजण म्हणजे माझे कुटुंब आहे. तेच मला पुढे नेणार आहेत.

एक युवा उमेदवार म्हणून लोकांना तुमच्याबद्दल काय वाटते?

मी जेव्हा लोकांमध्ये मिसळते तेव्हा युवा, महिला आणि ज्येष्ठ असे सर्वजण मला आशीर्वाद देतात. त्यांच्याशी माझे भावनिक, आपुलकीचे संबंध आहेत. पुढे आमदार (MLA) म्हणून त्यांच्यासाठी चांगले काम करणार आहे. त्यांना माझ्याकडून अनेक अपेक्षा आहेत आणि त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करणार यावर त्यांचा विश्‍वास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT