CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: तब्बल 'एवढ्या' जणांना मिळणार शिकाऊ नोकऱ्यांची नियुक्तिपत्रे

राष्ट्रीय शिकाऊ पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant येत्या १५ जुलै रोजी जागतिक कौशल्यदिनी राज्यातील 10 हजार जणांना सरकारी तसेच खासगी क्षेत्रात शिकाऊ नोकरीची नियुक्तिपत्रे दिली जाणार आहेत.

यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रात शिकाऊ नोकरीची संधी शोधणाऱ्यांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, या राष्ट्रीय पोर्टलमधून मिळणारी माहिती राज्यात नोंदणीकृत कौशल्य संच उपलब्ध असलेल्या संधींशी जुळवले जातील आणि त्यांना संबंधित क्षेत्रात शिकाऊ उमेदवारी दिली जाईल.

पात्रतेच्या आधारे शिकाऊ व्यक्तीला दरमहा 8 ते 13 हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाईल. ही योजना चालू आहे आणि भविष्यातही सुरूच राहील.

राज्यात वाढती बेरोजगारी कमी करण्याबरोबरच कुशल प्रशिक्षित उमेदवार मिळावेत यासाठी ही अप्रेंटिसशिप योजना सरकारने लागू केली आहे. या योजनेतील प्रशिक्षित उमेदवारांना डॅशबोर्डनुसार नोंदणीकृत आस्थापनांची माहिती दिली जाईल.

याशिवाय आस्थापनांनाही उमेदवारांचा तपशील पाहता येईल. राज्यात सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे शिकाऊ उमेदवारांना सुलभपणे नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

Ratnagiri News: रत्नागिरीत दुर्दैवी घटना, गुहागर समुद्रात मुंबईचं अख्खं कुटुंब बुडालं; नववर्षाच्या तोंडावर दु:खाचा डोंगर

Goa Drug Case: वाळपई पोलिसांची मोठी कारवाई! ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश, यूपी-बिहारमधील तिघे अटकेत

SCROLL FOR NEXT