Ram Mandir Consecration Dainik Gomantak
गोवा

Ram Mandir Consecration: प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेसाठी गोवेकर सज्ज! 'या' पंचायतींनी घेतला मांसाहार विक्री बंदीचा निर्णय

अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २२) राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर श्री राम पूजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.

Kavya Powar

Ram Mandir Consecration: अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २२) राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर श्री राम पूजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. यादिवशी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात मद्य, तसेच मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी घातली आहे.

यानिमित्त अस्नोडा पंचायतीने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, येत्या सोमवारी २२ रोजी अस्नोडा पंचायत कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, मद्यालये, चिकन सेंटर व मासळी मार्केट बंद ठेवावे असे निर्देश दिलेत.

उपलब्ध माहितीनुसार, येत्या २२ रोजी अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याअनुषंगाने देशभर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम तसेच धार्मिक उत्सव साजरे केले जात आहे.

त्याच अनुषंगाने अस्नोडा पंचायतीने परिपत्रक जारी करीत आपल्या पंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मद्यालये, मासळी विक्रेते, चिकन सेंटर, मटण सेंटर, चायनिज स्टॉल्स व फास्ट फूडवाल्यांना आपली आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. जर कुणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे जाहीर नोटीसद्वारे सूचित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येथील शांतादुर्गा मंदिरात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पंचायतीने केले आहे.

माशेल, कुंभारजुवे, खांडोळा, तोरसे, मये, पिर्ण, कुडणे, अस्नोडा येथील पंचायत मंडळांनीही तसा निर्णय घेऊन गावात नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

Goa Politics: दक्षिण गोव्यात राजकीय खलबतं! आमदार विजय सरदेसाईंनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची भेट

पर्तगाळी जीवोत्तम मठ 2 जानेवारीपासून बंद! भाविक-पर्यटकांना प्रवेशबंदी; अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT