Colva Beach Dainik Gomantak
गोवा

होळीच्या पार्श्वभूमीवर कोलवा बीच ठरला मद्यपानाचा अड्डा

होळीच्या दिवशी स्थानिक पर्यटकांनी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे आयोजित केल्या मिनी पार्ट्या

दैनिक गोमन्तक

कोलवा: गोव्यात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र स्थानिक पर्यटकांनी होळीच्या दिवशी शुक्रवारी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे मिनी पार्ट्या आयोजित केल्या होत्या. पोलिस आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही शहानिशा करण्यात अलेली नव्हती. (On the backdrop of Holi, colva Beach became a hub for drinkers)

मुख्यतः देशी पर्यटकांची मोठी गर्दी समुद्रकिनाऱ्यावर (Beach) दिसून आली आणि यापैकी काही लोक दारूच्या बाटल्यांसह मिनी पार्ट्या करण्यात गुंतलेले दिसले. यामुळे उपद्रव निर्माण झाला आहे. समुद्रकिनाऱ्याला भेट देणारी अनेक कुटुंबे या पर्यटकांपासून दूर एखादे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात, जेणेकरून त्यांना होळीच्या सुट्टीचा आनंद घेता येईल.

एका पर्यटकाला विचारले असता, समुद्रकिनाऱ्यावर दारू पिण्यास कोणतेही बंधन नाही असे सांगितले. धक्कादायक म्हणजे, समुद्रकिनाऱ्यावरील अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसाठी (Goa Police) असलेले शेड रिकामे होते. या भागात तैनात पोलिस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक ड्युटीवर होते. " धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत समुद्रकिनारी मद्यपानासाठी कोणीही हरकत घेतली नाही," हे स्थानिक वृत्तपत्राने त्यांच्या निदर्शनास आणून दिले दरम्यान कोलवा (Colva) पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मेलसन, कोलासो यांना संपर्क साधला असता त्यांनी देखील या बाबत कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Sales: गोव्यात दिवाळीदरम्यान 'रेकॉर्डब्रेक' वाहन खरेदी! GST कपातीमुळे ग्राहकांची पसंती; 11317 गाड्यांची नोंदणी

Horoscope: मोठा धमाका! अडकलेले पैसे मिळणार; आठवड्याची सुरुवात 'या' राशींना देणार भरभरून

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

Goa Vs Punjab: गोव्याचे पंजाबला दमदार प्रत्युत्तर! 92 धावांची अभेद्य सलामी; 'सुयश'चे अर्धशतक

Firing Case: नेमका ‘शूटर’ कोण समोर येणार? उगवे प्रकरणातील 'ते' पोलीस होते गोळीबार करणाऱ्या गटात; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT