On the occasion of 'Father's Day', memories shared, Bhakti, Sikha shared their father's stories
On the occasion of 'Father's Day', memories shared, Bhakti, Sikha shared their father's stories Dainik Gomantak
गोवा

वडील म्हणाले, भिऊ नकोस, मी आहे पाठीशी.!

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री ठामपणे उभी असते, असे म्हटले जाते. पण गोव्यातील दोन महिला खेळाडू ज्यांनी विश्वस्तरावर गोव्याच्या नावाचा डंका पिटविला त्यांच्यामागे जर कुणी कणखरपणे उभे राहिले असतील तर त्यांचे वडील. त्यांनीच या दोघींना अगदी बोट पकडून म्हणतात तसे यशाच्या वाटेवर आणले आणि तेही स्वतः खस्ता खाऊन.

(On the occasion of 'Father's Day', memories shared, Bhakti, Sikha shared their father's stories)

64 घरांची राणी भक्ती कुलकर्णी आणि अष्टपैलू खेळाने भारताला कित्येक सामन्यात जिंकून देणारी शिखा पांडे ही नावे आता गोव्यात घराघरांत पोहचली आहेत. या दोघींच्या ‘सक्सेस स्टोरीज’ मागे मी आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणत खंबीरपणे उभे राहिले ते त्यांचे वडील. प्रदीप कुलकर्णी व सुभाष पांडे या दोघांच्या आठवणी या दोन्ही खेळाडूंनी ‘गोमन्तक’कडे शेअर केल्या.

भक्ती म्हणाली, मी अडीच वर्षांची असताना बाबांनी मला बुद्धिबळ खेळाची आवड लावली. अवघ्या चार वर्षांची असताना मी पहिली स्पर्धा खेळली.

वडील म्हणाले, भिऊ नकोस, मी आहे पाठीशी.!

त्यावेळी ते मला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेसाठी घेऊन जायचे. माझ्या दौऱ्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी नोकरीत बढतीही घेतली नाही. त्यामुळे आज मी जी आहे ती माझ्या बाबांमुळेच.

सध्या भक्ती 28 जुलैपासून चेन्नईमध्ये होणाऱ्या चेस ऑलिंपिक्सची तयारी करते. पुरूष विभागात ग्रँडमास्टर किताब मिळविणे हे ध्येय तिने आपल्यासमोर ठेवले आहे. आतापर्यंत ही किमया भारतातील कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावली या दोन महिलांनीच केली आहे. भक्तीने ही किमया साधल्यास ती भारतातील तिसरी महिला खेळाडू ठरेल आणि तसे झाल्यास तिच्या बाबांसाठी हे सर्वात मोठे ‘गिफ्ट’ असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT