Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उद्या काणकोणात होणार व्याख्याने

'समकालीन युगातील छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर प्रभाकर ढगे व्याख्यानाचे पुष्प गुंफणार आहेत

दैनिक गोमन्तक

काणकोण: देळे, काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजु देसाई महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त दि.19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त कै. मंजू देसाई व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले असून ''समकालीन युगातील छत्रपती शिवाजी महाराज'' या विषयावर प्रभाकर ढगे व्याख्यानाचे पुष्प गुंफणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार पांडुरंग गावकर उपस्थित राहतील. ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन मंजु देसाई, उपाध्यक्ष के. बी. गावकर, सचिव मंजुनाथ देसाई, राजेंद्र देसाई, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अन्य विश्वस्त सदस्य, प्राचार्य प्रो. डॉ. मनोज कामत उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर महाविद्यालय सभागृहात व्याख्यान आणि सत्कारमूर्तींचा सत्कार होणार असल्याचे अध्यक्ष चेतन मंजु देसाईआणि सचिव मंजुनाथ देसाई यांनी कळविले आहे.

सदर समारंभात कै. डॉ. जिबलो नाईक गावकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार आर. बी. एस. कोमरपंत यांना, सहकार महर्षी कै. जयसिंगराव राणे स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार आनंदू उत्तम गणो देसाई यांना, कै. डॉ. पुंडलिक गायतोंडे स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार डॉ. प्रमोद किन्नरकर यांना, कै. आशालता वाबगावकर स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार निर्मलाताई मांद्रेकर यांना, तर कै. सीताराम टेंगसे स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार रामानंद जोशी यांना प्रदान करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction: काऊंटडाऊन सुरु! आयपीएल 2026 लिलावाची तारीख ठरली! रिटेन्शनची डेडलाईनही जाहीर

Finasteride Side Effects: टक्कल उपचाराच्या नादात 'मृत्यू'ला आमंत्रण, 'हे' औषध ठरू शकतं जीवघेणं! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य

Zenito Cardozo: 10 नोव्हेंबरपर्यंत कोर्टाला शरण या! सदोष मनुष्यवध प्रकरणात गुंड जेनिटोच्या अडचणी वाढल्या

Formula 4 Racing Goa: ‘फॉर्म्युला - 4 रेस’ आम्हाला नकोच! बोगदावासीयांचा निर्धार; जाहीर सभेत कडाडून विरोध

चोरट्यांनी आमदारालाही नाही सोडले, मायकल लोबो यांच्या रेस्टॉरंटमध्ये चोरी; रोकड लंपास

SCROLL FOR NEXT