Shiroda PHC Dainik Gomantak
गोवा

Shiroda PHC: दुर्दैवी! ऑन ड्युटी असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा रूग्णालयात कोसळून मृत्यू

आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी

Pramod Yadav

Shiroda PHC: शिरोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्य बाजावत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी अक्षया पावसकर यांचा रूग्णालयात कोसळून मृत्यू झाला. पावसकर रूग्णालयात अचानक खाली पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षया 38 वर्षांच्या होत्या. तरूण वैद्यकीय अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षया पावसकर रूग्णालयात कर्तव्य बजावत असताना, त्या अचनाक कोसळल्या. दरम्यान, याचवेळी त्यांचा मृत्यू झाला. अक्षया यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, शवविच्छेदनानंतर नक्की कारण समोर येईल असे सांगितले जात आहे.

मृत्यूच्या कारणाचा शोध घेणार

राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच, महिला डॉक्टरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा देखील विभागामार्फत शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT