Omkar elephant villagers Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'ओंकार'चा धुमाकूळ, हत्तीला गावातून पिटाळून लावण्यासाठी गावकऱ्यांची "हत्ती भगाओ मोहीम!"

Omkar elephant news: आता ग्रामस्थ आक्रमक होऊन "हत्ती भगाओ मोहीम" सुरु करण्याचा निर्धार केलाय

Akshata Chhatre

Omkar elephant Goa: उगवे परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ओंकार नावाच्या हत्तीने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले आहे. यापूर्वी त्याने तांबोशे गावात सात दिवस मोठा धुमाकूळ घातला होता. वन खात्याचे कर्मचारी या हत्तीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यांच्याकडे त्याला रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही, अशी माहिती समोर आली आहे आणि म्हणूनच आता ग्रामस्थ आक्रमक होऊन "हत्ती भगाओ मोहीम" सुरु करण्याचा निर्धार केलाय.

ग्रामस्थांची 'हत्ती भगाओ' मोहीम

वन खात्याचे कर्मचारी शेतकऱ्यांना शेतात जाण्यापासूनही रोखत असल्यामुळे पाळीव प्राण्यांना चारा मिळण्यासही अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून उगवे गावातील ग्रामस्थांनी हत्तीला गावातून हुसकावून लावण्यासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. रविवार, दिनांक २८ रोजी सकाळी १०:३० वाजता श्री देवी माऊली मंदिरासमोर जमून 'हत्ती भगावो' मोहीम राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी 'गंडेल बॉम्ब, ढोल आणि मशाल' घेऊन येण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

वन खात्याची हत्तीसमोर हतबलता

वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाहने राष्ट्रीय महामार्ग ६६ वर तैनात असून, शेतकऱ्यांना शेतात न जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र, सरकारकडे अद्यापही प्रशिक्षित हत्ती तज्ज्ञ उपलब्ध नाहीत. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिवाळी-दसरा झाल्यानंतर तज्ज्ञ येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, ओंकारने उगवे भागातील केळीची झाडे, कवाथे, पोफळी आणि भातशेती मोठ्या प्रमाणात फस्त केली आहे. या भागातील ताण गवतामुळे त्याला लपून राहणे सोपे झाले आहे, त्यामुळे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दिली असून, तांबोशे परिसरातील नुकसानीचा आकडाही लाखोंच्या घरात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Thalapathy Rally Stampede: अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 29 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी Watch Video

IND vs PAK: 'अभिषेक शर्मा शतक ठोकणार...' सुनील गावस्करांची मोठी भविष्यवाणी, पाकड्यांना धोक्याचा इशारा

गोवा महाराष्ट्र सीमेवरील जंगल, पोर्तुगीज काळातील 3 पोलीस चौक्या; हिवाळ्यातील हजारो बगळ्यांची माळ, 'म्हावळिंगेचा ओहोळ'

Omkar Elephant In Sindhudurg: गोव्यात धुमाकूळ घालणारा 'ओंकार' हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात, वनविभागाची धावपळ Watch Video

Goa Politics: भाजपला हरवण्यासाठी 'आप' युती करण्यास तयार, अमित पालेकरांचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT