Omkar Elephant Goa Dainik Gomantak
गोवा

Omkar Elephant: 'तो परत आलाय!' पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे धाबे दणाणले; महाराष्ट्रात गेलेल्या ओंकार हत्तीचा U-Turn

Omkar Elephant Returns: काही दिवस या हत्तीच्या दहशतीखाली असलेल्या गोव्यातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, मात्र आता पुन्हा एकदा या हत्तीने गोव्याच्या दिशेने आपली पावले वळवली

Akshata Chhatre

Omkar elephant Goa news: गेल्या दोन आठवड्यांपासून गोव्यातील तांबोसे आणि उगवे भागांतील शेतीचे अतोनात नुकसान करणारा ओंकार हत्ती महाराष्ट्रातील सातोसे (जि. सिंधुदुर्ग) भागात गेला होता. त्यामुळे काही दिवस या हत्तीच्या दहशतीखाली असलेल्या गोव्यातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, मात्र आता पुन्हा एकदा या हत्तीने गोव्याच्या दिशेने आपली पावले वळवली आहेत.

महाराष्ट्रातून परतला, गोमंतकीयांचे धाबे दणाणले

ओंकार हत्तीने महाराष्ट्रात दोन दिवस काढल्यानंतर तो पुन्हा गोव्यातील तोरसे भागात परतला आहे. त्यामुळे, गोव्यातील शेतकरी पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. महाराष्ट्रातील कास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेतीची नासाडी करत ओंकार हत्तीने तोरसे परिसरात प्रवेश केला आहे. या हत्तीमुळे गोमंतकीय नागरिक आधीच त्रस्त होते, आणि आता त्याचे पुन्हा गोव्यात येणे ही नवीन डोकेदुखी बनू शकते.

परत येण्याची शक्यता वर्तवली होतीच

गोव्यातून महाराष्ट्रात गेलेला ओंकार हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनला होता. सातोसे गावात पोहोचल्यानंतर त्याने थेट रहिवासी भागात प्रवेश केला, ज्यामुळे लोकांचे धाबे दणाणले. त्याला रहिवासी भागातून हाकलून लावण्यासाठी लोकांनी फटाके आणि ढोल-ताशे वाजवले होते.

त्यावेळी, त्याला पुन्हा गोव्याच्या दिशेने हाकलण्याचा प्रयत्न केल्यास तो गोव्यात परत येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे तो राज्यात शिरू नये, यासाठी गोवा वन खात्याचे कर्मचारी सतर्क असल्याची माहितीही समोर आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

2 October Dry Day: महात्मा गांधी जयंती निमित्ताने गोव्यात 'कॅसिनो' राहणार बंद, 'ड्राय डे'ची घोषणा; सरकारी आदेश जारी

गोव्यात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा; हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून स्वाक्षरी मोहीम

Suryakumar Yadav: आशिया कप जिंकल्यानंतर 'सूर्या'ची गोव्यात एंट्री! मंत्री माविन गुदिन्हो यांनी केलं स्वागत Watch Video

Goa Cabinet Decisions: मंत्रिमंडळाचा ‘डबल धमाका’! 'म्हजे घर' योजनेअंतर्गत घरांसाठी 'दर' निश्चित; दिव्यांग विभागात 28 नवीन पदे मंजूर

Womens World Cup 2025: क्रिकेट विश्वचषक रंगला देशभक्तीच्या सुरांनी, श्रेया घोषालनं गायलं भारताचं राष्ट्रगीत, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT