World Table Tennis Dainik Gomantak
गोवा

World Table Tennis: ऑलिंपिक विजेत्या 'मा लाँग व चेन मेंग' गोव्यातील स्पर्धेतून माघार

डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर ः मा लाँग, चेन मेंग यांच्यातर्फे कोविड, दुखापतीचे कारण

गोमन्तक डिजिटल टीम

World Table Tennis कोविड आणि दुखापतीचे कारण देत चीनच्या ऑलिंपिक विजेत्या मा लाँग व चेन मेंग यांनी गोव्यात सुरू झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेतून माघार घेतली. स्पर्धेच्या पात्रता फेरीला सोमवारपासून ताळगाव पठार येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरवात झाली. मुख्य स्पर्धा बुधवारपासून खेळली जाईल.

‘डब्ल्यूटीटी’तर्फे सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, मा लाँग, चेन मेंग, वँग चेकिन, वँग मॅन्यू, हे झुओजिया हे चीनचे खेळाडू कोविड व दुखापतीमुळे स्पर्धेत खेळणार नाहीत. लाँग व मेंग दोघंही टोकियो ऑलिंपिकमधील सध्याचे विजेते आहेत.

34 वर्षीय लाँग पुरुष एकेरीत द्वितीय क्रमांकावर आहे. त्याने तीन ऑलिंपिक स्पर्धांत पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. यामध्ये रिओ आणि टोकियो ऑलिंपिकमधील पुरुष एकेरीतील विजेतेपदाचा समावेश आहे. 29 वर्षीय मेंग महिला मानांकन सध्या दुसऱ्या स्थानी आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये ती महिला एकेरीत विजेती ठरली होती.

जागतिक क्रमवारीत सध्या अव्वल स्थानी असलेल्या फॅन झेंगडाँग याच्यावर चीनचा सर्वाधिक आशा असतील. जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकावरील वँग यिदी महिला एकेरीत अव्वल मानांकित असेल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

पाच मार्चपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 30 देशांतील एकूण 200 टेबल टेनिसपटूंचा सहभाग आहे. पात्रता फेरी मंगळवारी संपेल. मुख्य फेरीत अचंता शरथ कमल, साथियन ज्ञानशेखरन, मनिका बत्रा यांच्यावर भारताच्या आशा असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

SCROLL FOR NEXT