Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोवा संघटना सुस्त; ‘ऑलिम्पिक डे’चाच विसर

Goa News : खेळाडूंबाबत उदासीनता असल्याने नाराजी; इतर राज्यांत मात्र विविध उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

सचिन कोरडे

Goa News :

पणजी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ समितीची २३ जून १८९४ मध्ये स्थापना झाली होती. अधिकाधिक लोकांना ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी, कार्यक्रमाबद्दल ज्ञान वाढवण्यासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

देशाच्या विविध भागांत रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. गोव्यासारख्या छोट्या राज्यात मात्र यानिमित्ताने कोणताही कार्यक्रम आयोजित केला गेला नाही. गोवा ऑलिम्पिक संघटनेच्या या उदासीनतेबाबत राज्यातील काही खेळाडू आणि संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, क्रीडा क्षेत्राबाबत इतर राज्ये अधिक जागृत आहेत.

...म्हणून साजरा करतात हा दिवस

हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व वर्ग आणि वयोगटांतील लोकांच्या खेळाला प्राधान्य देणे. ‘आयओसी’ दर चार वर्षांनी ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक खेळ, हिवाळी ऑलिम्पिक खेळ आणि युवा खेळ आयोजित करतात. ‘ऑलिम्पिक डे’ हा आंतराष्ट्रीय कॅलेंडरवरही असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या दिवशी आम्ही काही विशेष कार्यक्रम आयोजित केला नाही; परंतु राज्यात ऑलिम्पिक भवन उभारण्याचा संकल्प आम्ही आज केला आहे. त्यादृष्टीने आम्ही कामालाही लागलो आहोत.

- गुरुदत्त भक्ता, सचिव, गोवा ऑलिम्पिक संघटना.

महाराष्ट्रात आम्ही मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला. आम्ही ‘वन डे रन’ आयोजित केली. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रीय पातळीवर राज्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा सन्मानही यावेळी करण्यात आला. रविवार असूनही मंत्री, क्रीडा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

- नामदेव शिरगावकर,

सचिव, (महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना)

सरकारी पातळीवर गोव्यात ‘ऑलिम्पिक डे’च्या निमित्ताने कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही. मात्र, काही संघटनांनी या दिनानिमित्त विविध उपक्रम तसेच कार्यक्रम घेतले. उदा. हॉकी संघटनेने खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

- गीता नागवेकर, कार्यकारी संचालक, साग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT