Old market became Mini Sonsodo Dainik Gomantak
गोवा

जुना बाजार बनला... मिनी सोनसोडो

कचरा साचला: मडगाव पालिका उदासीन; आजारांची भीती

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव नगरपालिकेच्या पाठीमागे असलेले जुना मासळी मार्केट परिसर मिनी सोनसोडो बनला आहे. तेथे साठवून ठेवण्यात आलेल्या कचऱ्यामुळे मलेरिया, डेंग्यूसह इतर आजार फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्‍यामुळे हा कचरा तातडीने हटविण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

समाजसेवक के. मेदेरा यांनी सांगितले की, पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. हा कचरा पावसाळ्‍यात आजाराला आमंत्रण देणार आहे. जवळच नगरपालिका आहे. कचराप्रश्नी वेळोवेळी नगरपालिकेत बैठकांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर तोडगा निघत नाही. पालिका मंडळ या बैठका कामधंदा नसल्याने आयोजित करीत आहे का? असा संतप्‍त सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला.

पूर्वीप्रमाणे जागेवर पार्किंगची सोय करावी

आपण लहान असताना येथे मासळी मार्केट होते. नंतर ते स्थलांतरित करण्यात आले. ही जागा खुली राहिल्याने येथे गाड्या पार्किंगची सोय करण्यात आली. नंतर तेही बंद करण्यात आले. आता येथे कचरा टाकण्यात येत आहे. त्‍यात हॉस्पिटलच्या कचऱ्याचाही समावेश आहे. पावसाळ्यात आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील कचरा हटवून वाहने पार्किंगची सोय पूर्वीप्रमाणे करावी अशी मागणी विवेक नाईक यांनी केली.

पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. हा कचरा पावसाळ्‍यात आजाराला आमंत्रण देणार आहे. जवळच नगरपालिका आहे. हा कचरा नगराध्यक्षांना दिसत नाही का? कचराप्रश्नी वेळोवेळी नगरपालिकेत तातडीने बैठकांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर तोडगा निघत नाही. पालिका मंडळ या बैठका कामधंदा नसल्याने आयोजित करते का?

- के. मेदेरा, समाजसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT