Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Mandovi Bridge: महत्वाची बातमी! जुना मांडवी पूल येत्या शनिवार, रविवार रात्रीचा बंद राहणार

या काळात अवजड वाहतुकीसाठी अटल सेतूमार्गाचा तर हलक्या वाहनांची वाहतूक नवीन मांडवी पुलावरून वळविण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandovi Bridge: जुना मांडवी पूल देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार (11 व 12 फेब्रुवारी) असे दोन दिवस बंद राहणार आहे. हे दोन दिवस संध्याकाळी दहा ते सकाळी सहा या वेळेत आठ तासांसाठी पूल बंद राहणार आहे.

या काळात अवजड वाहतुकीसाठी अटल सेतूमार्गाचा तर हलक्या वाहनांची वाहतूक नवीन मांडवी पुलावरून वळविण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी नवीन मांडवी पूल एक आठवड्यासाठी बंद होता

सार्वजनिक बांधकाम खात्याने नोव्हेंबर 2022 मध्ये नवीन मांडवी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव एक आठवड्यासाठी बंद ठेवला होता. 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान बंद ठेवण्यात आला होता. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूकीसाठी बंद ठेवला होता.

दरम्यान, त्यानंतर आता जुना मांडवी पूल दोन दिवसांसाठी बंद ठेवला जाणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची दखल घ्यावी असे आवाहन बांधकाम खात्याने केले आहे.

पूल बंद काळात या मार्गाचा करा वापर

बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूल बंद काळातील वाहतूकीचा पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहतूक अटल सेतू मार्गे आणि हलकी वाहने नवीन मांडवी पुलावरून वळवली जाणार आहे. वाहन चालकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन विभागाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inter Kashi I League Trophy: आय-लीग ‘ट्रॉफी’चा घोळ संपेना! इंटर काशीला नवीन करंडक प्रदान; चर्चिल ब्रदर्सचा संताप

Kane Williamson Retirement: केन विल्यमसनचा T20 क्रिकेटला अलविदा, कसोटी क्रिकेटवर करणार लक्ष केंद्रीत; म्हणाला, "युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ"

Goa Road Tender: रस्ता एक, दोन वेगवेगळ्या निविदा! 37 चे अचानक झाले 146 कोटी; गोव्यातील 'या' रस्त्याच्या कामावरून उलटसुलट चर्चा..

Goa News Today Live Updates: डिचोलीत भीषण अपघात! जीपगाडीची झाडाला धडक; कर्नाटकमधील तिघे गंभीर जखमी

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

SCROLL FOR NEXT