Porvorim Police: पोलिसांनी बसचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे
Goa Accident Deaths Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: प्रवासी बसच्या धडकेत वृद्ध ठार

गोमन्तक डिजिटल टीम

बेती येथे दुचाकीला पर्यटक प्रवासी बसने ठोकरल्याने सदानंद कृष्णा सुर्लीकर (वय ६१ वर्षे, रा. बेती) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी बसचालक रत्नाकर नाईक (वय ४७ वर्षे, रा. केपे) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.

हा अपघात बेती येथील कॅनरा बँकेसमोर शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता घडला. सुर्लीकर हे जीए-०३- एएक्स-१८२२ क्रमांकाच्या ईव्ही दुचाकीने घटनास्थळी आले होते. बँकेकडे जाण्यासाठी उजवीकडे वळण घेताना समोरून आलेल्या जीए-०८-यू-४७८५ क्रमांकाच्या पर्यटक प्रवासी बसने त्यांच्या दुचाकीला ठोकरले.

मार्बलवर पडून कामगाराचा मृत्‍यू

मार्बलवर पडल्याने एका ४८ वर्षीय कामगाराचा मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी काब दे राम येथे घडली. मृताचे नाव दिनेश वैज असे असून खोला-काणकोण येथील रहिवासी अाहे. दिनेश मार्बलच्‍या धारदार टोकावर पडला आणि गंभीर जखमी झाला. त्‍याला बाळ्‍ळी येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात आणले असता तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CRZ Goa: पर्यावरणमंत्र्यांच्‍याच जागेत ‘सीआरझेड’चे उल्‍लंघन करून बांधकाम; करमणेतील स्‍थानिकांचा दावा

Goa Today's News Live: दिगंबर कामत असंवेदनशील, मडगावात आजी-माजी नगरसेवकांची भाजपला सोडचिठ्ठी

United Nations: संयुक्त राष्ट्रात भारतानं पुन्हा केली पाकिस्तानची बोलती बंद; 'हा देश दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय...'

Goa Congress: 'मॉडेल मडगाव पोर्टल' पालिकेचे अधिकृत पोर्टल आहे का? अमित पाटकर यांचा सवाल

Margao Theft: जाब विचारण्यासाठी आला आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळाला!

SCROLL FOR NEXT