Old Goa Police today arrested a suspect who got away with Rs 40 lakhs from Tamil Nadu by luring them to book a Suzuki scooter. Dainik Gomantak
गोवा

Goa Police: स्कूटरच्या बुकिंगचे आमिष; 300 हून अधिक ग्राहकांची फसवणूक, ठकसेनला गोव्यात अटक

सुझुकी स्कूटरच्या बुकिंगचे आमिष दाखवून तामिळनाडूतील सुमारे 300 हून अधिक ग्राहकांकडून 40 लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या संशयित ए. राजेश याला आज जुने गोवे पोलिसांच्या मदतीने तामिळनाडू पोलिसांनी खोर्ली -जुने गोवे येथून अटक केली.

Shreya Dewalkar

सुझुकी स्कूटरच्या बुकिंगचे आमिष दाखवून तामिळनाडूतील सुमारे 300 हून अधिक ग्राहकांकडून 40 लाखांची रक्कम घेऊन पसार झालेल्या संशयित ए. राजेश याला आज जुने गोवे पोलिसांच्या मदतीने तामिळनाडू पोलिसांनी खोर्ली -जुने गोवे येथून अटक केली. तो जुने गोवे येथे राहत असलेल्या ठिकाणाहून 10 दुचाकी तसेच गोवा व कर्नाटकच्या बनावट क्रमांकपट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तामिळनाडू येथील कुनाईमुत्तूर पोलिस स्थानकात संशयित ए. राजेश याच्याविरुद्ध फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याने सुझुकी स्कूटरचे बुकिंगसाठी आमिष दाखवून काही लोकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती.

ज्यांनी बुकिंग केली होती त्यांना स्कूटर न मिळाल्याने तसेच ए. राजेश गायब झाल्याने पोलिस तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. कुनाईमुत्तूर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडत नव्हता.

संशयिताने गोव्यात आसरा घेतला असल्याची माहिती कुनाईमूत्तूर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी येथील पोलिसांशी संपर्क साधला. तो जुने गोवे परिसरात राहत असल्याचे कुनाईमुत्तूर पोलिसांना ठोस माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके तयार करण्यात आली.

या पथकाने खोर्ली, जुने गोवे, दोनापावल व करंझाळे येथे त्याचा शोध घेतला. अखेर तो खोर्ली येथे राहत असलेल्या ठिकाणी सापडला. त्याला ताब्यात घेऊन ट्रान्स्फर वॉरंटवर तामिळनाडू पोलिस गोव्यातून रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT