Entry Restricted at Basilica of Bom Jesus Dainik Gomantak
गोवा

St. Xavier Exposition: काही काळासाठी ओल्ड गोव्याच्या चर्चमध्ये प्रवेश बंद; काय आहे कारण?

Entry Restricted at Basilica of Bom Jesus: 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीसाठी पर्यटक आणि सामान्य जनतेसाठी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस तसेच से कॅटेड्रलमध्ये प्रवेश तात्पुरता बंद करण्याचा आदेश दिला आहे

Akshata Chhatre

ओल्ड गोवा: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनसोहळ्याला आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. दरम्यान देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या आणि यात्रेकरूंच्या स्वागताची तयारी देखील अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.

रविवारी (दि. 17 नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीसाठी पर्यटक आणि सामान्य जनतेसाठी बॅसिलिका ऑफ बॉम जीझस तसेच से कॅटेड्रलमध्ये प्रवेश तात्पुरता बंद करण्याचा आदेश दिला आहे.

21 नोव्हेंबरपासून ओल्ड गोव्यात होणाऱ्या होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या आगामी प्रदर्शनाची तयारी व्यवस्थित व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा तसेच या दरम्यान आलेल्या कुठल्याही पर्यटकाला अगर भाविकाला त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

जुने गोवे येथे सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याशव प्रदर्शनाचे हे 18वे वर्ष आहे. 5 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात गोव्याच्या सायबाच्या फेस्ताचा देखील समावेश होतो, म्हणूनच यंदाच्या वर्षी या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या प्रत्येकाचे योग्य आदरतिथ्य व्हावे म्हणून समितीचे आणि राज्यचे प्रयत्न सुरु आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT