गिर्‍हाईक फिरकत नसल्याने ओसाड पडलेले वास्कोतील जुन्या मासळी मार्केट मधील नूतनीकरण केलेले मार्केट. Dainik Gomantak
गोवा

Vasco Market: ग्राहकांविना ओसाड पडले वास्कोतील जुने मासळी मार्केट!

फळे, भाजी व अन्य किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यांना या मार्केटमध्ये ग्राहकच मिळत नसल्याने त्यांची घोर निराशा 'झालेली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को शहरातील जुन्या मासळी मार्केटमध्ये सोय केलेल्या विक्रेत्यांनी या मार्केटकडे पाठ फिरवली आहे. फळे, भाजी व अन्य किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यांना या मार्केटमध्ये ग्राहकच मिळत नसल्याने त्यांची घोर निराशा 'झालेली आहे. सध्या हे मार्केट ओस पडलेले असून मुरगाव पालिकेला आता या निर्णयाचा फेरविचार करावा लागण्याची चिन्हे आहेत.

(old fish market in Vasco was deserted without customers)

Market

मुरगाव पालिकेने वर्षभरापूर्वी वास्को शहरातील. नगरपालिका मार्केटमधील जुने मासळी मार्केट लाखो रूपये खर्च करून दुरूस्त केले होते. या मार्केटमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची सोय करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यामुळे मार्केट बाहेरील रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही.

वाहतुकीला व वाहने पार्किंगला ट अडचणी येणार नाही असा विचार उ त्यामागे होता. परंतु काही राजकीय ‍ र वादामुळे एक वर्षांहून अधिक काळ टे हे मार्केट दुरूस्त करूनही रिकामेच ि राहिले होते मात्र, मागच्या दोन महिन्यांपूर्वीच वास्कोच आमदार वि

दाजी साळकर यांनी या मार्केटचे उद्घाटन केले आणि बाहेर बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांना या मार्केटमध्ये जागा देण्यात आली. पक्के छप्पर लाभल्याने विक्रेत्यानाही प्रारंभी हायसे वाटले होते. मात्र, हे समाधान जास्त दिवस टिकले नाही. या मार्केटमध्ये ग्राहकपाय ठेवत नसल्याने सर्व विक्रेत्यांना चिंता सतावू लागली होती.

Market

बरेच दिवस ग्राहकांची वाट पाहूनही काही फायदा झाला नाही. चुकूनच एखादा ग्राहक मार्केटमध्ये प्रवेश करू लागला. त्यामुळे दिवसाचा सोपे देणेही त्याना कष्टाचे ठरू लागले. महिनाभर असाच ढकललेल्या या गरीब विक्रेत्यांनी अखेर या मार्केटचा नाद सोडला आहे. त्याकाळी सकाळी काही हे विक्रेते या मार्केटमध्ये थांबतात व नंतर पोटापाण्यासाठी दुसरीकडे कुठे तरी आश्रयाला जातात. तर काही जण व्यवसाय बंदच करून आहेत. बाहेर रस्त्याच्याकडेला बसून हे लोक दिवसा काही रूपये कमावत होते.

मार्केटमध्ये सोय करण्यात आल्यानंतर चिंताच वाटेला आलेली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या मार्केटला भेट देऊन विक्रेत्यांची विचारपूस केली होती. स्थानिक विक्रेत्यांकडून लोकांनी खरेदी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, ग्राहकांवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा कोणताही परिणाम झालेला नाही. याच जुन्या मार्केटपासून अवघ्याच काही अंतरावर नवीन भाजी मार्केट आहे. त्याच्याच जोडीला आता नवीन मासळी मार्केट आलेले आहे. तसेच फळ भाजी विक्रेत्यांचीही रस्त्यावरच स्वातंत्र सोय पालिकेने केलेली आहे. त्यामुळे आमच्याकडे ग्राहक कसे फिरकतील असा प्रश्न जुन्या मार्केटमधील या विक्रेत्यांनी केला आहे. पालिकेने आमच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढावा अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT