Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: विश्वास संपादन करून असहाय्य महिलेला 9 लाखांचा गंडा! वृद्धाश्रम सदस्याची करामत; दागिनेही केले लंपास

Old Age Home Member Fraud: बाणावली येथील वृद्धाश्रमातील असाहाय्य महिलेला ९ लाख २६ हजार ९४८ रुपयांना फसविल्याप्रकरणी पोलिसांनी ज्‍योकिम मान्‍यूएल डिसिल्वा याला अटक केली आहे.

Sameer Panditrao

Old age home member cheats women in Banaulim

मडगाव: बाणावली येथील एका वृद्धाश्रमातील असाहाय्य ज्येष्ठ महिलेला ९ लाख २६ हजार ९४८ रुपयांना फसविल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी ज्‍योकिम मान्‍यूएल डिसिल्वा याला अटक केली आहे.

मूळ पंचवाडी-शिरोडा येथील गिर्लेमिना डिकॉस्‍ता या ८६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला या फसवणुकीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. बाणावली येथील डॉ. राफेल असिलो ओल्ड एज होम येथे हा प्रकार घडला. १ डिसेंबर २०१६ ते ९ जुलै २०२४ यादरम्यान डिकॉस्ता या वृद्धाश्रमात होती. तिच्या पतीचे निधन झाले असून तिला अपत्यही नाही. एका धर्मगुरूने तिला या वृद्धाश्रमाची माहिती देऊन तेथे पाठविले होते. डिसिल्‍वा हा या वृद्धाश्रमाचा समिती सदस्य आहे. त्याने तिचा विश्वास संपादन केला.

गरजेच्या वस्तू तो तिला आणून देत होता. नंतर तिने आपले एटीएम कार्ड आणि बँक चेकही त्याला दिला होता. त्याचा गैरफायदा घेत संशयिताने तिला फसविले. तसेच धमकावून तिच्याकडील दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही लंपास केले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोविड काळातही हेळसांड

कोविड काळात दूरचे नातेवाईक गिर्लेमिना हिची विचारपूस करीत असतानाही डिसिल्‍वा त्यांना काहीही माहिती देत नव्हता. शेवटी ते नातेवाईक बाणावलीला आले आणि तिला घेऊन गेले. सध्या ती मुंबई येथे अंधेरीला राहते. याप्रकरणी कोलवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानंतर उपनिरीक्षक प्रसन्न भगत यांनी संशयितावर गुन्हा नोंद करून अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT