Oil spills beaches Dainik Gomantak
गोवा

गोव्यासह 'या' राज्यातील किनारे बनतायेत तेलगळतीचे हॉट स्पॉट

समुद्रकिनारे प्रदूषित झाल्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने दिली माहिती

दैनिक गोमन्तक

भारतातील समुद्रकिनारे हे देशाची बलस्थाने आहेत. कारण देशाची आयात - निर्यात ही सर्वाधिक समुद्रमार्गेच होते. तसेच देशाचे समुद्रकिनाऱ्यांना पर्यटनासारख्या मार्गाने परकीय गंगाजळी मिळून देणारे पर्याय म्हणून ओळखले जातात. मात्र यावर आता तेलगळतीचा काळा पडत असून प्रशासनाने याकडे वेळीच गांभिर्याने न पाहिल्यास हा प्रश्न आणखी जटील होणार आहे. (Oil spills turn Gujatart, Maharashtra, Goa, Karnataka beaches murky)

मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) ने एका अभ्यासात म्हटले आहे की. भारतातील पश्चिम किनार्‍यावरील तेल गळतीचे तीन हॉट स्पॉट झोन तयार झाले आहेत. हे तीन हॉट स्पॉट झोन पश्चिम आणि नैऋत्य भारतातील समुद्रकिनारे प्रदूषित करण्यासाठी जबाबदार ठरु शकणार आहेत.

या प्रमाणे देशातील पश्चिम आणि नैऋत्य भारतातील समुद्रकिनारे प्रदुषित म्हणून गणले गेल्यास मोठ्या प्रमाणात आपली सागरी संपत्ती गमवावी लागणार आहे. तसचे गोव्यासह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात राज्यातील किनारे बनले तेलगळतीसाठीचे हॉट स्पॉट बनू पाहात आहेत.

याबाबत अभ्यास करण्यासाठी 'मॅन्युअल क्लस्टरिंग' पद्धतीची शिफारस केली आहे. अज्ञात तेल गळतीचे वितरण. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातचे मूळ समुद्रकिनारे हे तेल गळतीमुळे पर्यावरणीय धोकादायक बनू पाहात आहेत. तसेच सध्य स्थिती पाहता देशाचे पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्ग सर्वात व्यस्त आहेत. त्यामूळे याचा ही विचार करत या समस्या संपवण्यासाठी ठोस पावले उलचलणे आवश्यक बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT