Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

G20 Summit: आगामी G20 शिखर परिषदेसाठी दाबोळी विमानतळावर अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांच्यासह G20 शिखर परिषदेचे नोडल अधिकारी आणि सचिव (प्रोटोकॉल) संजित रॉड्रिग्स आणि विभागाच्या इतर प्रमुखांनी G20 शिखर परिषदेपूर्वी गोवा विमानतळाजवळ संयुक्त पाहणी केली.

दैनिक गोमन्तक

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील विविध सरकारी संस्था आगामी शिखर परिषदेच्या तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी नवी दिल्लीतील G20 शिष्टमंडळासह बैठका घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांच्यासह G20 शिखर परिषदेचे नोडल अधिकारी आणि सचिव (प्रोटोकॉल) संजित रॉड्रिग्स आणि विभागाच्या इतर प्रमुखांनी G20 शिखर परिषदेपूर्वी गोवा विमानतळाजवळ संयुक्त पाहणी केली.

यावेळी पुनीत कुमार गोयल म्हणाले की, आम्ही गोव्यात होणाऱ्या आठव्या G20 शिखर परिषदेपूर्वी संयुक्त पाहणी करत आहोत. गोव्यात सुमारे आठ बैठका होणार आहेत आणि आम्हाला आमच्या राज्याची सर्वोत्तम कामगिरी जगाला दाखवायची आहे आणि हेच या संयुक्त पाहणीचे कारण आहे.

G20 शिखर परिषदेचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्स म्हणाले की, G20 शिखर परिषदेपूर्वी राज्यातील रस्ते आणि महामार्ग विकसित केले गेले आहेत आणि गोव्यातील G20 शिखर परिषद यशस्वी होईल याची खात्री करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये चांगला समन्वय ठेवण्याची योजना देखील आम्ही बनवली आहे.

गोवा विमानतळाचे संचालक धनमजय राव यांनी सांगितले की, G20 शिखर परिषद यशस्वी होण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांमध्ये दक्षिण गोवा एसपी अभिषेक धानिया, ट्रॅफिक एसपी दक्षिण प्रबोध शिरवईकर, वास्को ट्रॅफिक पीआय शैलेश नार्वेकर, एअरपोर्ट ट्रॅफिक पीआय राहुल दामशेकर आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT