Crime News Dainik Gomantak
गोवा

Crime News: सोशल मिडीयावर प्रभू श्रीरामावर आक्षेपार्ह पोस्ट! अल्पवयीन युवकाला अटक

श्रीरामावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केरी सत्तरी येथील अल्पवयीन युवक अल्फाज खान याला अटक, अपना घर मधे त्याची रवानगी. 

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: केरी सत्तरी येथे एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काल (30 जानेवारी) संध्याकाळी केरी येथील ग्रामस्थांनी चेक पोस्टवर जमून त्या युवकाला अटक करण्याची जोरदार मागणी केली.

यावेळी मोठमोठ्याने श्रीरामाच्या घोषणा देत त्या युवकाला अटक करण्याची जोरदार मागणी केली. सुमारे 300 पेक्षा अधिक नागरिकांचा जमाव चेकपोस्टवर हजर होता. जोपर्यंत त्या युवकाला अटक करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे जमावातर्फे सांगण्यात आले.

'आमच्या श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. केरी गावात कोणत्याही धर्माचा भेदभाव केला जात नाही. मात्र या युवकाने सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. आणि त्याला माफी नाही,' असे मत नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी त्या युवकाला पोलीस स्थानकात आणण्यात आल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

मात्र संतप्त नागरिकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी वाळपई पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी जमावाला शांत केले. संशयित अल्पवयीन आहे त्यामुळे कोणीही कायदा आपल्या हातात घेऊ नका, अशी मागणी करत त्यांनी सर्वांची समजुत काढली. संशयिताचे नाव अल्फाज खान असून तो 17 वर्षाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT