Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीसाठी ओबीसींना आरक्षण द्यावेच लागेल

भंडारी समाज: निवडणूक आयोगाला निवेदन

दैनिक गोमन्तक

पणजी: पंचायत निवडणुका इतर मागास वर्गास (ओबीसी) बाजूला ठेवून घेतल्या जात आहेत. तुम्हाला निवडणुका घ्यायच्या होत्या, तर घाईगडबडीत निवडणुकांची अधिसूचना काढण्याची गरज नव्हती. ओबीसांना डावलून निवडणुका घेतल्या जावू नयेत, त्यामुळे 1 जुलै रोजी काढलेली आरक्षणाची अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन गोमंतक भंडारी समाज समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला सादर केले.

(OBCs will have to make reservations for the elections in goa)

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या चेअरमनांची भेट घेतली. उपाध्यक्ष देवानंद नाईक, खजिनदार जोगुसो नाईक, महिला सचिव संध्या पालेकर, तालुका सचिव हेमांगी, दिलीप नाईक, जयेश नाईक, विश्‍वास चोडणकर यांची उपस्थिती होती.

निवेदन सादर करण्यामागील भूमिका अध्यक्ष नाईक यांनी पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले की, ज्या-ज्यावेळी भंडारी समाजावर अन्याय होतो, तेव्हा आम्हाला आमच्या हक्कासाठी रस्त्यावर यावे लागते. पंचायत निवडणुकांचे आरक्षण निवडणूक आयोगाने जाहीर करताना ओबीसींना डावलून केले आहे. राज्यात सर्वाधिक ६० टक्के जनता असलेला हा समाज आहे. ओबीसी समाजात 19 जाती आहेत, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या आरक्षणाचा विषय सुटण्यासाठी निर्णय घेऊ. ओबीसी आयोगाचे प्रमुख ॲड. मनोहर आडपईकर यांनी आम्हाला चार-पाच दिवसांत तिहेरी चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

सरकारने ओबीसी समाजाला बाजूला ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. राज्य सरकारला ओबीसी आरक्षण देता आले नाही, तर आम्ही दोन-तीन दिवस वाट पाहू, त्यानंतर समाजाची भूमिका स्पष्ट केली जाईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन हा विषय सोडवावा, असेही नाईक म्हणाले.

रवी-शिरोडकरांशी चर्चा

मंत्री रवी नाईक व सुभाष शिरोडकर हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत. ते सरकारात असतानाही ओबीसींना आरक्षण मिळू शकले नाही, याबाबत आम्ही त्यांच्याकडे ही बाब मांडली आहे. त्यावर नाईक व शिरोडकर यांनी लवकर त्याविषयी आम्ही सरकारकडे चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT