Goa Road Safety Dainik Gomantak
गोवा

Goa Road Safety: रस्ता सुरक्षा; नुवे येथे 'कार्मेल'च्या विद्यार्थिनींकडून जनजागृती मोहीम

Road Safety Awareness: मागच्‍या वर्षात गोव्‍यात रस्‍ता अपघातात मृत पावलेल्‍या पादचाऱ्यांची संख्‍या ५२ एवढी माेठी असून गाेव्‍यातील पादचाऱ्यांच्‍या मृत्‍यूची टक्‍केवारी राष्‍ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मागच्‍या वर्षात गोव्‍यात रस्‍ता अपघातात मृत पावलेल्‍या पादचाऱ्यांची संख्‍या ५२ एवढी माेठी असून गाेव्‍यातील पादचाऱ्यांच्‍या मृत्‍यूची टक्‍केवारी राष्‍ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे, याकडे रस्‍ता सुरक्षा चळवळीत काम करणारे ‘गोवा कॅन’ या संस्‍थेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्‍स रस्‍त्‍यावर पुरेसे सुरक्षा उपाय न घेतल्‍यामुळेच पादचाऱ्यांचे मृत्‍यू वाढले आहेत, असे मत व्‍यक्‍त केले.

गोवा कॅन आणि कार्मेल उच्‍च माध्‍यमिक विद्यालयाच्‍या ग्राहक कल्‍याण क्‍लबतर्फे आज नुवे येथे रस्‍ता सुरक्षा जागृती मोहीम हातात घेऊन या क्‍लबचे सदस्‍य असलेल्‍या विद्यार्थ्यांनी राष्‍ट्रीय महामार्गावर सुरक्षेविषयीचे फलक दाखवून लोकांमध्‍ये जागृती केली.

नुवे येथे कार्मेल महाविद्यालयाजवळही सुरक्षेचे पुरेसे उपाय घेतले नाहीत याकडे मार्टिन्‍स यांनी लक्ष वेधून या परिसरात विद्यालय असूनही रस्‍त्‍यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगविलेले नाहीत, असे त्‍यांनी सांगितले.

कामाचे फलक लावणे बंधनकारक

सध्‍या नुवे येथे रस्‍त्‍यावर दुरुस्‍तीचे काम सुरू आहे. अशावेळी ज्‍या कंत्राटदाराकडून काम केले जाते त्‍याची माहिती देणारे फलक रस्‍त्‍यावर लावणे सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार बंधनकारक आहे.

मात्र, नुवे येथे असे कोणतेही फलक नाहीत याकडे लक्ष वेधून या संबंधात आम्‍ही दक्षिण गोव्‍याचे अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी रमेश गावकर यांच्‍याकडे तक्रार केलेली आहे, असे त्‍यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Health Insurance: "प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला 10 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स द्या", 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चर्चेसाठी मागितला वेळ

VIDEO: 38 व्या वर्षी क्रिकेटपटूचं निधन; राशिद खान ढसाढसा रडला राशिद खान; अंत्ययात्रेतील व्हिडिओ भावुक करणारा

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांची खिलाडू वृत्ती

Goa Digital Library: राज्यात केवळ 2.9 टक्‍के शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी; 33 टक्‍के शाळांमध्येच 'स्मार्ट क्लासरूम', केंद्र सरकारचा अहवाल

Goa crime: तुये खुनीहल्ला प्रकरण; तिळारी परिसरात नेऊन नर्सला मारण्‍याचा होता डाव? संशयित गौतमला 7 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT