Nuvem Residents Strongly Oppose NH66 Expansion Cite Unnecessary Development
मडगाव: राष्ट्रीय महामार्ग 66च्या प्रस्तावित विस्ताराला नुवे येथील रहिवाशांनी विविध कारणे देऊन तीव्र विरोध दर्शवला आहे. नुवे येथून नवीन महामार्गाला बगलमार्ग बांधल्यापासून जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विस्ताराची गरज नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नुवे जुना राष्ट्रीय महामार्ग 66च्या विस्ताराबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचे काम पूर्ण करण्याबाबत सुतोवाच केले होते. मात्र, जुन्या राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर नवीन महामार्ग बांधण्यात आल्यापासून वाहतूक नवीन महामार्गाकडे वळत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ठेकेदारावर भाजप (BJP) सरकार कोणतीही कारवाई करत नाही. कारण तो भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा जावई आहे. या कंत्राटदाराने केलेले सर्व प्रकल्प निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.