Goa Murder Mase Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दुचाकी चोरीच्या संशयावरून अनोळखी तरुणाला बेदम मारहाण; नुवेत उपचारापूर्वीच मृत्यू, खूनप्रकरणी तिघांना अटक

Nuvem Goa Murder Case: दुचाकी चोरीच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुवे येथे घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दुचाकी चोरीच्या संशयावरून एका अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुवे येथे घडली. याप्रकरणी मायणा- कुडतरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

ग्रेसन फर्नांडिस (वय २८ वर्षे), डॉम्निक फर्नांडिस (वय ५२ वर्षे) आणि फ्रान्सिस डायस (वय ४३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ऍशली फर्नांडिस आणि हेन्री फर्नांडिस या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत सुरावली येथून एक बुलेट चोरीला गेली होती. ही बुलेट ग्रेसन फर्नांडिस यांच्या मालकीची आहे.

या दुचाकी चोरीच्या संशयावरून नुवे येथे काहीजणांनी एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाला अडविले. जमावाने त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्या युवकाला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, इस्पितळात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच मायणा-कुडतरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तीन संशयितांना अटक केली. चोरीला गेलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१),१८९(२), १८९(३) आणि १९० अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण पिंगे पुढील तपास करत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीवर चोरी किंवा अन्य गुन्ह्याचा संशय असल्यास स्वतःहून मारहाण न करता संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. संशयिताबाबत तातडीने माहिती देण्यासाठी नागरिकांनी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Goa Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT