goa covid19.jpg
goa covid19.jpg 
गोवा

Covid-19 Goa: 44 दिवसांनंतर सक्रिय रुग्‍णांची संख्‍या दहा हजारांच्‍या खाली

दैनिक गोमंतक

पणजी: गोव्यात (Goa) तब्बल 44 दिवसानंतर सक्रिय कोरोनाबाधितांची (Covid-19 Positive)  एकूण संख्या पुन्हा एकदा दहा हजारांच्या खाली आली आहे. 21 एप्रिल 2021 रोजी 9300 सक्रिय कोरोनाबाधित होते. त्यानंतर ती संख्या वाढत वाढत गेली व 13 मे रोजी सर्वांत जास्त 32 हजार 953 सक्रिय कोरोनाबाधित झाले. त्यानंतर पुन्हा या संख्यामध्ये कपात होत गेली व आज 3 जून रोजी सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या खाली आला. तो 97000 एवढा आहे. (Number of active patients of covid-19 is less than ten thousand in goa)

आरोग्य खात्याने कोरोना नियंत्रणासाठी तथा कोरोनाबाधित बरे होण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांना यश येत असून राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीचाही मोठा लाभ कोरोनाबाधितांची व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यासाठी होत आहे. आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार आज 3331 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहीर झालेल्या अहवालानुसार आज 572 नवे कोरोनाबाधित सापडले. गेल्या दीड महिन्यातील ही कमी संख्या आहे. 

कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य अधिकारी व डॉक्टरांची आभासी पद्धतीने बैठक घेऊन गावागावातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर 45 वर्षांवरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, यासाठी खास प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

चोवीस तासांत 17 जणांचा मृत्‍यू
आज 1695 कोरोनाबाधित बरे झाले असून मृत्यूचेही प्रमाण कमी होत आहे. आज 17 कोरोनाबाधित मरण पावले.  त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 2710 वर पोहोचली आहे. राज्यात आजच्या दिवशी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 9700 एवढी आहे. आज 572 कोरोनाबाधित सापडले, त्यातील 482 कोरोनाबाधितांनी घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त 90 कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर 98 कोरोनाबाधितांनी आज इस्पितळातून डिस्चार्ज घेतला. राज्यात कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी वाढलेली असून ती 92.14 टक्के एवढी झाली असून राज्यात कोविड रुग्‍ण सापडण्‍याचा सरासरी दर कमी झाला असून तो आज 17.17 टक्के एवढा झाला आहे.

‘गोमेकॉ’मध्येच सर्वाधिक मृत्यू
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाले, त्यातील बहुतांश गोमेकॉत इस्‍पितळातील आहेत. आज १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, त्यातील 10 जण गोमेकॉत उपचार घेत होते. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 2 कोरोनाबाधित दगावले, तर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळांमध्ये दोघा कोरोनाबाधितांनी आज अखेरचा श्वास घेतला. उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळामध्ये दोन कोरोनाबाधित दगावले, तर ईएसआय इस्पितळ मडगाव येथे एका कोरोनाबाधिताचा मृत्‍यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT