Goa University 
गोवा

Goa NSUI: परीक्षेचा निर्णय बदलला अन्यथा कुलगुरुंना घेरणार; काँग्रेस युवा संघटनेचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी: पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा ऑफलाईन(offline exams) पद्धतीने घेण्याचा निर्णय गोवा विद्यापीठाने(Goa University) सोमवारी 21 जूनपर्यंत बदलला नाही, तर कुलगुरू आणि कुलसचिव यांना घेराव घालण्याचा इशारा काँग्रेस युवा संघटना एनएसयुआयने दिला आहे. 

गोवा विद्यापीठाने 17 जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहेत. देशातील अन्य विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या असताना विद्यापीठाचा ऑफलाईन परिक्षेसाठी अट्टहास का? असा प्रश्न संघटनेचे राज्य अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी उपस्थित केला आहे. ‘कोविड’च्या दुसऱ्या लाटेत कित्येक गोमंतकीयांचा जीव गेला. तिसरी लाट येण्याच्या मार्गावर आहे. युवा व मुलांसाठी ही अधिक जीवघेणी असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे माहिती असून देखील, विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का करू पाहत आहे, असे चौधरी म्हणाले. 

‘कोविड’च्या दुसऱ्या लाटेवेळी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. काहींनी आपले पालक गमावले. काही विद्यार्थी इस्पितळात आपल्या पालकांची काळजी घेत आहेत. काही पालकांनी आपला मुलगाच गमावला असून, काही कोरोना झाल्याने गृह विलगीकरणात आहेत. विद्यार्थी दुसऱ्या लाटेतून सावरले नसताना विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer: महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Helipad Viral Stunt : रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT