Food Truck Dainik Gomantak
गोवा

आता फूड ट्रकची संख्या वाढतेय..!

वेळीच नियंत्रण गरजेचे : गोमेकॉसमोर उघड्यावरच विकले जातात पदार्थ

दैनिक गोमन्तक

पणजी : गोमेकॉसमोरील फळविक्रेत्यांना हटविल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असे वाटत होते; पण तसे काहीच झाले नाही. त्याशिवाय याठिकाणी केलेल्या वाहन पार्किंगमुळे वाहनांची सोय झाली तरीही भुयारी मार्गावरून सरळ विद्यापीठ मार्गाकडे जाणारी वाहने आणि गोमेकॉकडे येणारी वाहनांना पार्किंग क्षेत्रातील उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांचा सतत अडथळा होत आहे.

(Now the number of food trucks is increasing in goa)

याशिवाय सध्या या परिसरात संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत लागणाऱ्या फूड ट्रकची संख्याही वाढू लागली आहे. त्याशिवाय या सर्व गाड्यांवर उघड्यावरच अन्न विक्री होत असते, त्यामुळे ते आरोग्यालाही धोकादायक आहे.

येथील स्टॉलधारक हटविल्यानंतर सुरवातीला एक फूड ट्रक याठिकाणी लागत होता, परंतु आता पाच ते सहा फूड ट्रक याठिकाणी उभे राहतात. या फूड ट्रकमध्ये मिळणारे अन्नपदार्थ खरेदीसाठी येणारे वाहनधारक कोठेही वाहन उभे करतात. याठिकाणी खरेतर वाहतूक पोलिसांची गरज असतानाही पोलिस कोठेच दिसत नाही. एकापाठोपाठ फूड ट्रकची संख्या वाढत असल्याने त्या फूड ट्रकमागील गाळे सुरू झाल्यानंतर ते कुठे जाणार हा प्रश्‍न आहे. या हातगाड्यांवर चायनिजपासून सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. ज्याप्रमाणे येथील गाडेवाले हटविले गेले, त्यानंतर त्यांचे आंदोलन सुरू झाले, तसा प्रकार घडण्यापूर्वी यंत्रणेने पावले उचलणे गरजेचे आहे.

सध्या केवळ फूड ट्रकच नाहीतर कपडे विक्रीचा स्टॉलही येथे लागतो. जे गाळे बांधून तयार आहेत, ते सर्व बंद असल्याने या गाळ्यांचा परिसर अस्वच्छ बनला आहे. या ठिकाणी फूड ट्रकवाले ट्रक उभा करून अन्नपदार्थ तयार करून विकतात. विशेष बाब म्हणजे फूड ट्रकवाल्यांची वाढणारी संख्या पुढे चिंताजनक ठरू शकते. वेळीच पंचायतीने किंवा संबंधित यंत्रणेने यावर निर्बंध आणणे आवश्‍यक आहे.

पंचायतीला महसूल मिळण्याचे साधन

गोमेकॉचा सर्व परिसर कुडका पंचायत क्षेत्रात येतो. त्यामुळे कुडका-बांबोळी-तळावली पंचायतीला या फूड ट्रकवाल्यांकडून भाड्यापोटी किती रुपये मिळतात, हे समजू शकले नाही. परंतु सध्या या पंचायतीवल प्रशिक्षक आहेत. येथील विक्रेत्यांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दुकान गाडे बांधले असले तरी पुन्हा एकदा दुसऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढूत आहे, त्याकडे ही पंचायत का लक्ष देत नाही, असा सवाल उपस्थित होतो. ज्या ठिकाणी वाहने उभी केली जातात, त्या परिसराच्या स्वच्छतेकडेही पंचायत लक्ष पुरवित नसल्याचे दिसते.

एफडीए तपासणी आवश्‍यक

अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) या ठिकाणी उघड्यावर विक्री करणाऱ्या अन्न पदार्थांचा दर्जा किंवा येथील स्वच्छतेची मुख्यत्वे तपासणी करणे आवश्‍यक आहे. जे फूड ट्रक लागतात, त्यांना कोणत्या खात्याने मान्यता दिली, हे ही काही समजू शकले नाही. दरम्यान, याबाबत एफडीएच्या संचालकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उत्तर मिळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT