Domestic LPG Price Hiked Dainik Gomantak
गोवा

Gas Cylinder Price: आता संतापाचा ‘स्‍फोट’ नजीक!

युरी आलेमाव : सुशिक्षित बेरोजगार युवकांना पकोडे तळणेही बनले कठीण ही तर गरिबांसाठी आर्थिक आणीबाणीच

गोमन्तक डिजिटल टीम

Domestic LPG Cylinder Price Hiked: होळी सणाच्‍या तोंडावर भाजप सरकारने सर्वसामान्यांना आणखी एक झटका देताना घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आज 50 रुपयांनी वाढविली. त्‍यामुळे आता प्रत्येक सिलिंडरसाठी आता 1117 रुपये मोजावे लागतील.

मध्यमवर्गीय आणि गरिबांवर लादलेली ही आर्थिक आणीबाणीच आहे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरही 350 रुपयांनी वाढविल्याने आता त्‍यासाठी 2118 रुपये द्यावे लागतील. एकंदर स्थिती पाहता आता सुशिक्षित बेरोजगार युवकांना पकोडे तळणेही कठीण होईल, असा टोला आलेमाव यांनी हाणला.

भाजप सरकारने घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या केलेल्या दरवाढीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी भाजप सरकार सातत्याने जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोप केला. या दरवाढीमुळे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

असंवेदनशील भाजप सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या वाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्‍या किमतीत वाढ अटळ आहे, असेही आलेमाव म्‍हणाले.

आता जनताच सरकारला धडा शिकविणार

त्रिपुरा, मेघालयामधील निवडणुका संपताच केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली. आता कर्नाटकची निवडणूक संपल्यावर याची पुनरावृत्ती होणार नाही कशावरून? राजस्थानमधील क्राँग्रेस सरकार ५०० रूपयांना गॅस सिलिंडर देते. विद्यमान सरकारने आमची अर्थव्यवस्था दुबळी केली आहे. त्यांना योग्य प्रकारे सरकार चालवता येत नाही. २०२४ मधील निवडणुकीत जनता या सरकारला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

- बिना नाईक, महिला प्रदेश क्राँग्रेस अध्यक्षा

हॉटेल व्यावसायिकांनाही फटका; एकदम मोठी वाढ; प्रचंड नाराजी

सरकारने अकस्मात व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात वाढ केल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. हॉटेल म्हणजे मेनूचे दर निश्र्चित असतात, त्यात अकस्मात वाढ करता येत नाही.

त्यामुळे एका सिलिंडवर जेवढी वाढ होत असते, तेवढे आम्‍हाला नुकसान होत असते. आम्हाला दिवसाला एक सिलिंडर लागतो. याचाच अर्थ दरवाढ झालेले 350 रुपये आमचे प्रत्‍येक दिवशी नुकसान, असे मडगाव येथील ‘अशोक हॉटेलचे मालक विश्र्वनाथ तारी यांनी प्रस्‍तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सरकारने एकदम साडेतीनशे रुपये वाढवायला नको होते. दरवाढ जर हळूहळू झाली ती कळत नाही. जरी 50-100 रुपये वाढले असते तरी ते परवडले असते. सरकारने पहिल्यांदाच एवढी मोठी दरवाढ केली असल्याचे तारी यांनी सांगितले. गोव्यासह देशभरातील हॉटेल व्यावसायिक या दरवाढीमुळे नाराज बनलेले आहेत.

मोफत सिलिंडर योजना अडकलीय अजून लालफितीत

1) राज्‍यातील सत्ताधारी भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत गॅस सिलिंडरची योजना जाहीर केली होती. मात्र सरकार सत्तेवर येऊन वर्ष होत आले तरी ही योजना लालफितीतच अडकलेली आहे. याबाबत ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे यांनी आज ‘गोमन्तक’ला सांगितले,

2) या योजनेची कागदोपत्री तयारी पूर्ण झाली असून योजना अर्थखात्याकडे सादर केली आहे. दरम्‍यान, यावरून सदर योजना चालू आर्थिक वर्षात म्हणजे मार्चअखेरपर्यंत तरी लागू होणार नाही, हे निश्‍चित झाले आहे.

3) भाजपच्‍या आश्‍‍वासनाला भुलून जनतेने या सरकारला सत्तेवरही आणले. मात्र, अजूनही ही योजना लागू केलेली नाही. पूर्वी सिलिंडर कोणाला मोफत देणार हे ठरले नव्हते, परंतु आता राज्यातील बीपीएल शिधापत्रिकाधारकांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असे सांगितले जातेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

SCROLL FOR NEXT