Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: आता ड्रोन ठेवणार वनक्षेत्रावर नजर!

Vishwajeet Rane: आग लावणारे रडारवर; वन कर्मचाऱ्यांसह ट्रॅकरही मैदानात

दैनिक गोमन्तक

Vishwajeet Rane: वनक्षेत्र तसेच वन्यजीव अभयारण्यात आगीच्या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी वन कर्मचाऱ्यांसह ट्रॅकरना 31 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण दिले जाईल. खात्याकडे सुमारे 600 वन ट्रॅकर आहेत.

अभयारण्‍य किंवा वनक्षेत्रात आग लावण्याचा प्रयत्न केल्यास दोषींविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही माफ केले जाणार नाही, असा इशारा वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिला.

गेल्या वर्षी आगीमुळे सत्तरी तालुक्यातील अभयारण्य व वन्यजीवांना मोठी झळ बसली होती. याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री राणे यांनी आज वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून सूचना ऐकून घेतल्या. त्यावेळी लागलेल्या आगीत सुमारे 76.5 हेक्टर वनक्षेत्रातील झाडे व प्राणी नष्ट झाले होते.

तसेच मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी तेथे पावसाळ्यात सुमारे 65 हेक्टर वनक्षेत्रात झाडे लावण्यात आली. स्थानिक लोकांनाही ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामुळे आपत्कालीन वेळेत त्यांचीही मदत होऊ शकते, असे राणे म्हणाले.

वन्यजीव अभयारण्य व खासगी वनक्षेत्रासाठी वेगवेगळे कायदे व कारवाईचे अधिकार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच खात्यातर्फे पत्र पाठवून आगीला कारणीभूत असलेल्या व्यक्तींविरोधात कारवाईबाबतची नोटीस जारी करण्यास सांगण्यात येणार आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणेही खरेदी केली जातील. आपत्ती व्यवस्थापन व वन खात्‍याने एकत्र काम करण्याची गरज आहे. आत्तापर्यंत ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे व इतरांना दिले जाईल, असे राणे यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT