2 special ambulance for accident victims in south and north goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Cases: आता अपघातग्रस्तांना मिळणार वेळेत उपचार! आरोग्य विभागातर्फे खास 2 रुग्णवाहिका तैनात

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

Kavya Powar

2 special ambulance for accident victims in south and north goa

राज्यातील वाढते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. यावर उपाययोजना राबवण्यासाठी गोवा सरकार, वाहतूक पोलीस आणि राज्य पोलीस संयुक्तपणे कार्यरत आहेत.

याबाबत आरोग्यविभाग पुढे सरसावले असून, अपघातग्रस्तांसाठी म्हणून खास 2 रुग्णवाहिका तैनात केल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

मंत्री राणेंनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की,

अपघातग्रस्तांना जलद प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही 2 समर्पित रुग्णवाहिका राज्य रस्त्यावर, विशेषतः महामार्गांसाठी ठेवत आहोत. या रुग्णवाहिका GVK द्वारे आरोग्य सेवा संचालनालयाच्या अंतर्गत चालवल्या जातील. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे.

दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यासाठी प्रत्येक एक अशा दोन समर्पित रुग्णवाहिका महामार्गांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

यामुळे अपघात घडल्यावर, त्यातील पीडितांना वेळेत रुग्णसेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे राणेंनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT