Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: नियम मोडणाऱ्यांवर आता ‘स्मार्ट’ नजर!

सोमवारपासून अंमलबजावणी : मेरशी जंक्‍शनवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणा कार्यान्वित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Traffic Management Using AI: राज्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्राव्हन वाहतूक व्यवस्थापन पद्धत आजपासून मेरशी जंक्शनवर सुरू झाली.

या यंत्रणेद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनांच्या नोंदीबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. नियम उल्लंघन केलेल्या वाहन मालकांना छायाचित्राच्या पुराव्यासह ‘ई चलन’ घरपोच पाठवले जाणार आहे.

गोव्यातील हा पहिलाच प्रकल्प मेरशी जंक्शनवर प्रायोगिक तत्वावर सुरू झाला असून 20 मार्चपासून नियम मोडणाऱ्यांना ई-चलन पाठवून दंडात्मक कारवाई होणार आहे. याच प्रमाणे राज्यभरात आणखी 16 ठिकाणी स्मार्ट सिग्नल्स उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पातून जमा होणाऱ्या महसुलाचे प्रमाण 70: 30 असे असेल व त्याबाबतचा निर्णय वाहतूक खाते घेईल. या यंत्रणेसाठी लागणाऱ्या साधनसुविधा व देखभालची जबाबदारी कंपनीची असेल. या यंत्रणेवर कंपनीने 40 लाख रुपये गुंतवले आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स ड्राव्हन वाहतूक व्यवस्थापन पद्धतीचे उद्‍घाटन आज सकाळी 11 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मेरशी जंक्शन सिग्नलच्या ठिकाणी झाले.

यावेळी बांधकाममंत्री नीलेश काब्राल, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, आमदार रुदॉल्फ फर्नांडिस, संचालक राजन सातार्डेकर, पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा तसेच बेलटेक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या यंत्रणा सार्वजनिक भागिदारी प्रकल्पातून (पीपीपी) सुरू करण्यात आली आहे.

अपघात रोखण्याचा उद्देश; ‘हरित गोवा’च्या दिशेने पाऊल

  • हरित ऊर्जासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ई-चार्जिंग बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

  • हल्लीच गोवा माईल्सतर्फे सीएनजी टॅक्सी उपलब्ध करण्यात आल्या. हवेतील धूर प्रदूषण टाळण्यासाठी वाहतुकीसाठी ई चार्जिंग तसेच सीएनजी केंद्रे राज्यभर सुरू केली जातील.

  • वाहन चालकांनी वाहतूक नियम पाळल्यास अपघात आपोआप कमी होतील. दरदिवशी 1 ते 2 तर वर्षाकाठी 365 पेक्षा अधिक व्यक्तींचा रस्ता अपघातात मृत्यू होत आहे. नियम करणे सरकारचे काम आहे व ते पाळणे हे वाहनचालकांच्या हाती आहे. त्यांनी गोव्यातील नियमांचे पालन करावे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

VIDEO: पाकडे कधीच सुधरणार नाही! वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर सॅम अयूबचं वादग्रस्त सेलिब्रेशन; अभिषेक शर्माने दिलं चोख प्रत्युत्तर

Theft Case: शिरदोनमधील 12 लाखांच्या चोरीचा पर्दाफाश; भारतीय चलनासह डॉलर-पौंड अन् पासपोर्ट जप्त

Baina Flyover Accident: बायणा उड्डाणपुलावर काळाचा घाला; कठड्याला दुचाकीची धडक, 20 फूट खाली कोसळून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT