Goa mining Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील खाण लीजधारकांना 300 कोटींच्या नोटिसा

120 कोटी रुपये केले वसूल : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

पणजी : चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे राज्यातील खाण लीजधारकांना 300 कोटींच्या नोटिसा बजावल्या असून त्यापैकी 120 कोटी रुपये वसूल केले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकारांना दिली.

खाणींच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज खाण संचालक विवेक एच.पी., ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल आणि खाण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंट समितीने दिलेल्या अहवालानुसार 1 हजार कोटी रुपयांपर्यंतचा महसुलामध्ये तफावत आहे. याबाबत सखोल चौकशी करून लीजधारकांना 300 कोटीपर्यंतच्या नोटीस बजावल्या आहेत. यातील 120 कोटी रुपये सरकारने वसूूल केले आहेत, तर 180 कोटी रुपयांसाठी खाण लीजधारकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लवकरच हे पैसेही वसूल होतील. ‘कॅग’च्या रिपोर्टवर अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे.

खाणींबाबतचे सर्व व्यवहार जलदगतीने

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व खाणी सरकारच्या ताब्यात आल्या असून सर्व व्यवहार जलदगतीने केले जातील. दोन ते तीन महिन्यांत खाणींचे ब्लॉक करून लिलाव करण्यात येईल. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला लिलाव प्रक्रियेत सामील केले आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

खंदकांची देखभाल करणार : पावसाळा सुरू झाला असून खंदकांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे सर्व खंदकांवर देखरेख करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून सर्व खंदकांची काळजी घेतली जात आहे. खंदकांमधून पाणी उपसा सुरू असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT