Goa BJP Government News, Goa Political News Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरकारच्या शपथविधीचा थांगपत्ताच नाही!

सरकार स्थापनेस विलंब: भाजप संसदीय समितीची प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुका होऊन आणि भाजपला बहुमत मिळून आठवडा उलटला तरीही विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड तसेच सरकारच्या शपथविधीचाही थांगपत्ता नाही. यामुळे राज्यात नागरिक व नेत्यांमध्ये संभ्रम कायम आहे. यामागे ‘होलिष्टक’ असल्याचे कारण देत सरकार स्थापनेचे सर्व अधिकार केंद्रीय संसदीय समितीला असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. त्यामुळेच सरकार स्थापनेची ‘तारीख पे तारीख’ मिळत आहे. (Goa BJP Government News Updates)

विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 हा बहुमताजवळचा आकडा मिळाला आहे. मगो आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्याने हा आकडा 25 च्या जवळ पोचल्याने सध्यातरी भाजपजवळ सरकार स्थापनेसाठीचे बहुमत आहे.

मात्र, निकाल उजडून आठवला उलटला तरी सरकार स्थापनेचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यभर अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या परंपरेनुसार केंद्रीय पक्षश्रेष्ठी विशेष निरीक्षकांची नेमणूक करून पक्षाच्या निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतात आणि ते नेता निवडीची घोषणा करतात.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांनी या विशेष निरीक्षकपदी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमरसिंग आणि केंद्रीय खाद्या आणि पशूसंवर्धन मंत्री एल. मृरगन यांची नेमणूक केली आहे. ते 14 मार्चला राज्यात येणार होते. अद्यापही ते कधी येणार याचा पत्ता नाही. होळीनंतर या प्रक्रियेला वेग येईल, इतकेच मोघम उत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले.

दरम्यानच्या काळात हंगामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत मंत्रिमंडळ आणि सरकारच्या स्थापनेबाबत चर्चा केली आहे. मात्र, सर्व निर्णय पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय संसदीय समितीवर सोपवले आहे.

विश्वजीत यांची दावेदारी कायम

मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा राज्यभर रंगली आहे. त्यात नेतेपदाची निवड रेंगाळत आहे. त्यामुळे संभाव्य नावांवर उलट-सुलट चर्चा होत आहेत. भाजपमधील आमदार आणि काही नेते या चर्चांना वारा देत आहेत. यात विश्वजित राणे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणे आणि फोन करणे सुरू ठेवले आहे. यामुळे भाजपाच सारेच काही सुस्थितीत आहे, असे नाही. त्यामुळे चर्चा वाढतच आहेत.

विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याची चर्चा असली तरी मुख्यमंत्रिपदावरून कोणताही संभ्रम नाही. भाजपच्या परंपरेनुसार केंद्रीय संसदीय समिती विधीमंडळ सदस्य आणि भाजप कोअर कमिटी चर्चा करून मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करतील. लवकरची ही समिती गोव्यात येत आहे.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT