Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मुहूर्त गुडीपाडव्याचा! उत्तरेत पत्रादेवी तर दक्षिणेत लोहिया मैदानावरून काँग्रेस करणार लोकसभा प्रचाराचा शुभारंभ

Goa Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसने कबंर कसली आहे.

Manish Jadhav

Goa Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसने कबंर कसली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच आता, काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले इंडियाचे आघाडीचे दोन उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस उद्यापासून (मंगळवार 9 एप्रिल 2024 रोजी) हुतात्मा स्मारक, पत्रादेवी येथून सकाळी 9 वाजता आणि लोहिया मैदान, मडगाव येथून दुपारी 12.30 वाजता प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रचाराची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

पाटकर म्हणाले की, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. प्रचाराच्या प्रारंभाने "गोवा बचाओ" ची चळवळ सुरु होणार आहे.

आज लोकशाही धोक्यात आहे. भाजपने सुरु केलेल्या पक्षांतरांमुळे आपल्या संविधानावर हल्ला होत आहे. आपली जमीन क्रोनी आणि भांडवलदारांनी ताब्यात घेतली आहे. आता गोव्याची ओळख जपण्याची वेळ आली आहे. भाजपची हुकूमशाही राजवट संपवण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊ या, असे आवाहन पाटकर यांनी केले आहे.

पाटकर पुढे म्हणाले की, ''गोमंतकीयांकडून मिळत असलेल्या भावनिक पाठिंब्याने आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या सर्व नेत्यांना शेकडो फोन येत असून भाजपला सत्तेतून दूर करण्याच्या आमच्या ध्येयाशी लोक पाठिंबा दर्शवत आहेत.''

गोमंतकीयांनी हुतात्मा स्मारक, पत्रादेवी आणि लोहिया मैदान, मडगाव येथे मोठ्या संख्येने जमा व्हावे आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना आपला बहुमोल पाठिंबा द्यावा अशी मी समस्त गोमंतकीयांना नम्र विनंती करतो, असे पाटकर म्हणाले. आम्ही तुम्हाला वचन देतो की, आमचे दोन्ही उमेदवार संसदेत "गोव्याचा आवाज" बनून काम करतील, असेही पाटकर शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'चे काम जोरात! कोचीहून दुसरे पथक येणार गोव्यात; लवकरच सेवा होणार सुरु

Tiger Reserve: 'व्याघ्र प्रकल्पा'चे ठरणार भवितव्य, केंद्रीय समिती येणार गोव्यात; सर्वोच्च न्यायालयाला देणार अहवाल

Mapusa Theft: म्हापसा दरोडा! दरोडेखोरांची टोळी 4 राज्ये ओलांडून बांगलादेशात? पोलिसांचे प्रयत्न तोडके

Rama Kankonkar: 'रामा काणकोणकर' पडले एकाकी? विरोधकांचा थंड प्रतिसाद; भाजप पोलिस तक्रार करण्याची शक्यता

Horoscope: नोकरीत बढती, नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम दिवस; वयाने तरुण असाल तर 'या' राशींचे उजळेल भाग्य!

SCROLL FOR NEXT