North Goa SP Akshat Kaushal Press Conference Update Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: शवदर्शन सोहळ्यासाठी येताय? गोवा पोलिसांनी जारी केलेली नियमावली वाचा

North Goa SP Press Conference: पत्रकार परिषदेत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी 45 दिवसांसाठी केलेल्या नियोजनाचा आराखडा मांडला

Akshata Chhatre

Goa Police Guidelines Exposition Iffi 2024

पणजी: सध्या गोव्यात दोन महत्वाचे कार्यक्रम होणार आहेत, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्यामुळे यात्रेकरू, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येत गोव्यात येणार आहेत.

हे दोन्ही कार्यक्रम आंतराष्ट्रीय स्थरावर महत्वाचे असल्याने गोवा पोलिसांनी यामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होऊ नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि. 20 नोव्हेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी 45 दिवसांसाठी केल्या गेलेल्या नियोजनाचा आराखडा मांडला.

सेंट झेवियर यांच्या पवित्र अवशेष प्रदर्शनाच्यावेळी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एकूण 1,500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या पोलिसांचे तीन प्रमुख विभागांमध्ये विभाजन केले असून हे पोलिस कर्मचारी तीन वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करतील अशी माहिती उत्तर गोव्याचे एसपी अक्षत कौशल यांनी दिली.

शव प्रदर्शन सोहळ्याच्यावेळी काय करावं आणि काय करू नये याची माहिती देणारे साइन बोर्ड्स लावले जातील, यासोबतच वाळूचे काही बंकर्स सुद्धा उभारले जाणार आहेत. एकूण सोहळ्यावर पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून लक्ष ठेवतील एवढंच नाही तर ओल्ड गोवा इथे होणाऱ्या या महत्वपूर्ण सोहळ्यावर ड्रोन आणि वॉच टॉवरद्वारे कडक नजर ठेवली जाणार आहे.

सेंट झेवियर शव प्रदर्शन सोहळ्याच्यावेळी धातूंची तपासणी करण्यासाठी मेटल डिटेकटर्स महत्वाच्या ठिकाणांवर उभारले जातील. शव प्रदर्शनाच्या समितीसह पोलिसांच्या चर्चा सुरु आहेत आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस नक्कीच प्रयत्न करीत अशी खात्री कौशल यांनी यावेळी माध्यमाशी बोलताना दिली.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या एक्सपोझिशनसाठी जवळपास एक हजार तर इफ्फी सोहळ्यासाठी 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना एक्सपोझिशनच्या ठिकाणी कॅमेरा, धारदार वस्तू, तसेच ज्वलनशील वस्तू घेऊन जाण्यावर बंदी असेल. नागरिकांनी कसल्याच प्रकारची मौल्यवान वस्तू परिधान करून एक्सपोझिशनच्या ठिकाणी येऊ नये, असे आवाहनही कौशल यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT