sign board Dainik Gomantak
गोवा

''राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी सूचना फलक लावणार''

रोलँड मार्टिन्स: उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समिती बैठकीत घेतला निर्णय

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील रस्ता अपघात रोखण्यासाठी तसेच आवश्‍यक सूचना फलक लावण्यासंदर्भात आज उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पणजीतील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बिगर आयएसआय दर्जाच्या हेल्मेटवर अधिक भर देताना हेल्मेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती या समितीचे सदस्य व ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलँड मार्टिन्स यांनी बैठकीनंतर दिली.

(North Goa Road Safety Committee will put up sign boards to prevent road accidents in the state)

उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव देसाई, वाहतूक व वाहतूक पोलिस अधिकारी व रोलँड मार्टिन्स यांची बैठक झाली. मार्टिन्स म्हणाले, समितीमध्ये रस्त्यावर गतिरोधक, वेगमर्यादा, सूचना फलक व झेब्रा क्रॉसिंग आवश्‍यक ठिकाणी प्राधान्यक्रमाने उभारण्याबाबत चर्चा झाली.

अनेक दुचाकी चालक आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट वापरत असल्याने या हेल्मेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबरोबर बैठक घेण्याबाबत ठरविण्यात आले. वाहनाच्या मागील बाजूने अनेकजण सायकल बांधण्यासाठी सुविधा ठेवत असून ती धोकादायक आहे. अपघातात मागाहून दुचाकी धडकला तर मोठा अनर्थ ठरू शकतो.

पुलाच्या किंवा उड्डाण पुलाच्या प्रवेशाच्या ठिकाणी वेगमर्यादा व वळण घेण्यासंदर्भातचे सूचना फलक लावण्यात येतात त्याऐवजी ते पूल किंवा उड्डाल पूल येण्यापूर्वी किमान 100 मीटर सूचना फलक लावण्याचे ठरवण्यात आले. राज्यातील असलेल्या अपघातप्रवण क्षेत्रे तसेच अपघातप्रवण ठिकाणे याची यादी करण्याच्या सूचना वाहतूक अधिकारी व वाहतूक पोलिसांना करण्यात आल्या आहेत, असे मार्टिन्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT