Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: उत्तर गोव्यात पोलिस 'ऍक्शन मोडवर'! 122 समाजकंटकांविरोधात कारवाई

North Goa Police Action: राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर गोवा पोलिस अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Major Police Operation Nets 122 Anti-Social Elements in North Goa

पणजी: राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर गोवा पोलिस अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली आहे. या धडक मोहिमेत गेल्या आठ दिवसांत उत्तर गोव्यातील १५ पोलिस स्थानकांत १२२ समाजकंटकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील वाढते गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक पोलिस स्थानकात विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. उत्तर गोव्यातील १४ पोलिस स्थानकांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये शांतता भंग करणे, वाद निर्माण करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडवणे अशा प्रकरणांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाढत्या गुन्हेगारांच्या घटनांची दखल घेतल्यानंतर पोलिस महासंचालकांनी सर्व पोलिस प्रमुखांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर वारंवार गुन्ह्यात सामील असलेल्या समाजकंटकांना पोलिस स्थानकांत बोलावून ताकीद देण्याचे प्रकारही सुरू आहेत.

उत्तर गोव्यात १० ते १८ ऑक्टोबर या काळात कारवाईचे निर्देश देऊन १२ तास तसेच २४ तासांनी कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार १४ पोलिस स्थानकांनी केलेल्या कारवाईची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना पाठवली आहे. पणजी, कोलवाळ, म्हापसा, डिचोली, पेडणे व कळंगुट या पोलिस स्थानकांच्या हद्दीतील कारवाई केलेल्या समाजकंटकांची संख्या अधिक आहे.

धडक मोहीम सुरूच राहणार

१. समाजकंटकांविरुद्धची पोलिसांची ही धडक मोहीम सुरू राहणार असून अजूनही काहींचा शोध पोलिस घेत आहेत.

२. किनारपट्टी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

३. इंडियन रिझर्व्ह बटालियन पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. बीट पोलिस तसेच पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे.

४. रात्रीच्यावेळी प्रत्येक पोलिस स्थानकाच्या हद्दीतील ३० टक्के पोलिस कर्मचारी प्रामुख्याने गस्तीवर ठेवण्याची सक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT