दक्षिण गोव्यात माझ्या अंदाजानुसार भाजपला 25 हजार मताच्या आघाडीची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही, तरी आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो- दिगंबर कामत
दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिस यांचा 14,216 मतांनी विजय झाला असून, त्यांना 2,16,022 एवढी मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या पल्लवी धेंपे यांना 2,01,806 एवढी मते मिळाली आहेत.
विरियातो फर्नांडिस संसदेत गोव्याचा आवाज होतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या विरियातो फर्नांडिया याच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अद्याप औपचारिक घोषणा बाकी असली तरी विरियातोंचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस व इंडिया आघाडीचे नेते आनंदोत्सव साजरा करतायेत.
आज पाच पांडवांनी कौरवांचा पराभव केलाय, आजचा विजय मनी पावर विरोधात लोकांचा विजय असल्याचे विरियातो म्हणाले.
अद्याप अंतिम निकाल समोर आलेला नसला तरी काँग्रेसकडून दक्षिण गोव्यात विजयी जल्लोषाला सुरुवात केलीय. विरियातो यांना दक्षिण गोव्यात १५,५४५ मतांची आघाडी मिळाली आहे.
दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. दरम्यान, भाजपने दक्षिणेत फेरमतमोजणीची मागणी केलीय. विरियातो यांनी विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी समस्त गोंयकारांचे देखील आभार मानले आहेत.
दक्षिणेत मोदींनी सभा घेतली मात्र या उमेदवाराचा पराभव झाला आहे. हा मोदींचा नैतिक पराभव असल्याचा उल्लेख देखील विरियातो यांनी केला. मनी पॉवरचा पीपल पॉवरने पराभव केल्याचे विरियातो म्हणाले.
दक्षिण गोव्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस विजयाच्या जवळ पोहोचताना दिसत आहेत. विरियातो पहिल्यापासून आघाडीवर आहेत, सध्याच्या घडीला त्यांना 20,950 मतांची आघाडी आहे.
सकाळी बारा वाजेपर्यंतची आकडेवारी
विरियातो फर्नांडिस - 1,97,462 (+ 20532)
पल्लवी धेंपे - 1,76,930 ( -20532)
रुबर्ट परेरा - 16,469 ( -180993)
दक्षिण भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे विजयी होतील, असा दावा माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी केला आहे. दक्षिणेत सध्या लीड कमी असले तरी भाजप उमेदवार विजयी होईल, असे तेंडुलकर म्हणाले.
सकाळी अकरा वाजेपर्यंतची आकडेवारी
विरियातो फर्नांडिस - 1,43,809 (+ 12249)
पल्लवी धेंपे - 1,31,560 ( -12249)
रुबर्ट परेरा - 12,094 ( -131715)
दक्षिण गोव्यात सध्या पल्लवी धेंपे आणि विरियातो फर्नांडिस यांच्या टफ फाईट होताना दिसत आहे. तिसऱ्या फेरीनंतर विरियातो 12,527 मतांनी आघाडीवर आहेत.
तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी
विरियातो फर्नांडिस - 99,109 (+ 7724)
पल्लवी धेंपे - 91,385 (-7724)
रुबर्ट परेरा - 8962 (-90147)
दक्षिण गोव्यात विरियातो फर्नांडिस नऊ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
सांगे आणि शिरोड्यातून पल्लवी धेंपे आघाडीवर आहेत तर, कुडचडे आणि केपेत काँग्रेस आघाडीवर आहे.
दक्षिण गोव्यात ईव्हिएमच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर साडे आठ वाजता EVM मतमोजणीस सुरुवात झालीय.
मतमोजणी केंद्रात अवैधपणे प्रवेश करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दिगंबर कामतांना अटक करा. दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी याबाबत आरओ आणि पोलिसांकडे तक्रार केलीय.
गोव्यातील दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीस प्रारंभ झाला असून, सर्वप्रथम पोस्टल मते मोजली जाणार आहेत. साडे आठनंतर EVM ची मतमोजणी केली जाणार आहे.
Dempo will win by 25k - Digambar Kamat
गोव्यात भाजपच्या पल्लवी धेंपे यांचा 25 हजार मतांनी विजय होईल, असे मत माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे.
दक्षिण गोव्यातही अनेक मुद्दे गाजले. भाजपच्या महिला उमेदवार पल्लवी धेंपे आणि कॉंग्रेस उमेदवार विरीयातो फर्नांडिस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. पल्लवी धेंपे यांच्या संपत्तीचा मुद्दाही चांगलाच गाजला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पल्लवी धेंपे यांच्यासाठी प्रचारभा घेऊन लढत आणि चुरशीची बनवली. संविधान गोव्यावर लादल्यचा मुद्दा चांगलाच गाजला. विरीयातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला होता.
भाजपने दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे (Pallavi Dempo) यांना निवडणुकीच्या मैदानात उरवले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने दक्षिण गोव्यातून विरीयातो फर्नांडिस (Viriato Fernandes) यांना मैदानात उतरवले आहे. दक्षिण गोव्यातील मतदार कुणाला विजयी करणार याचा फैसला थोड्याच वेळात कळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.