North Goa Firework Ban Dainik Gomantak
गोवा

North Goa Firework Ban: हॉटेल, क्लब अन् बीच शॅक्समध्ये फटाके वाजवल्यास खैर नाही, उत्तर गोव्यात 8 फेब्रुवारीपासून कडक बंदी

Goa District Magistrate Order: उत्तर गोव्यातील सार्वजनिक सुरक्षितता आणि आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे.

Manish Jadhav

पणजी: उत्तर गोव्यातील सार्वजनिक सुरक्षितता आणि आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट्स, नाईट क्लब आणि बीच शॅक्समध्ये फटाके आणि इनडोअर पायरोटेक्निक्स वापरण्यावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी 2026 पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होणार असून पुढील 60 दिवसांपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

सार्वजनिक सुरक्षेसाठी उचलले पाऊल पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर गोव्यात (North Goa) अनेकदा इव्हेंट आणि पार्ट्यांदरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, गर्दीच्या ठिकाणी किंवा बंदिस्त जागेत अशा प्रकारच्या दारुकामामुळे आगी लागण्याचा मोठा धोका असतो. संभाव्य जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. विशेषतः ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते, अशा 'हाय-फूटफॉल' क्षेत्रांमध्ये सुरक्षिततेचे मानके उंचावणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, केवळ मोकळ्या मैदानावरच नव्हे, तर हॉटेल्स, बार, बीच शॅक्स आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी (Event Venues) फटाके किंवा तत्सम ज्वालाग्राही वस्तूंचा वापर करता येणार नाही. यामध्ये लग्नसमारंभ, संगीताचे कार्यक्रम आणि नाईट पार्टींचाही समावेश आहे. 60 दिवसांच्या या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आयोजक आणि मालकांना सहकार्याचे आवाहन प्रशासनाने स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे. हॉटेल मालक, इव्हेंट आयोजक आणि सामान्य जनतेने या आदेशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निवासी आणि पर्यटक दोघांसाठीही सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही बंदी आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NRI Property Rights India: परदेशात राहणाऱ्या मुलींना भारतात वडिलांची शेतजमीन वारसाहक्काने मिळते का? वाचा काय सांगतो कायदा

GST Reforms From 1 November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार GST चे नियम! नोंदणी होणार सोपी, रिफंड मिळणार फास्ट; मोदी सरकारची व्यापाऱ्यांना दिवाळी भेट

Bomb Threat News: अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी, दिलजीत दोसांझही निशाण्यावर; मुंबईच्या महापौर कार्यालयाला ईमेल मिळाल्याने खळबळ

Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

Bambolim Traffic Diversion: गोव्यातील वाहनचालकांनो, लक्ष द्या! रविवारी पहाटे 1 ते 6 बांबोळीतील वाहतूक वळविणार; पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT